Journalist threatened..पत्रकाराला बंदुकीने उडवून देण्याची धमकी श्रीगोंद्यात खळबळ..पत्रकार चंदन घोडके यांना धमकी दिल्या प्रकरणी पत्रकार संघटना आक्रमक..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा शहरातील पत्रकार चंदन घोडके यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या गंभीर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणी तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पारधी समाजा संबंधी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या रागातून संतोष इंगळे या व्यक्तीने पत्रकार चंदन घोडके यांना बंदुकीने उडवून देण्याची धमकी दिली.या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट हल्ला मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.तसेच पत्रकार चंदन घोडके यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशीही मागणी करण्यात आली आहे.यासोबतच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात,असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेचा पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.पत्रकारांवर होणाऱ्या धमक्यांचे वाढते प्रकार चिंताजनक असून आरोपींवर कठोर झाली पाहिजे.
