Crime..संघटितपणे गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या टोळीवर कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या गोवंश जनावरांच्या कत्तलीचा व गोमांस विक्रीचा मोठ रॅकेट कॅम्प पोलिसांनी उधळून लावला आहे.आसिफ इक्बाल कुरेशी,तनवीर मोहम्मद कुरेशी दोघे रा.भिंगार, आशिक इक्बाल कुरेशी हा टोळीचा मोरक्या असून या प्रकरणी संबंधित टोळीवर भारतीय न्याय संहिता कलम १११ तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि.३० मार्च २०२६ रोजी कॅम्प पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,भिंगार परिसरात काही जण संगनमत करून गोवंश जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याचे समोर आले.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली.तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की,आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी एकत्र येऊन गोवंश जनावरांची वाहतूक,कत्तल व गोमांस विक्रीचा व्यवसाय करत होते.या प्रकारामुळे कायद्याचे गंभीर उल्लंघन झाले असून समाजातही संतापाची लाट उसळली आहे.या प्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नं.भारतीय न्याय संहिता कलम तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस अंमलदार पांडुरंग बारगजे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलूबर्मे,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोलीस अंमलदार दिलीप शिंदे पोलीस अंमलदार प्रमोद लहारे यांनी केली आहे.कॅम्प पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे शहरात कायद्याचा धाक पुन्हा निर्माण झाल्याचे चित्र आहे. अवैध धंद्यांवर पोलिसांचा बारीक नजर असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
