Republican Party of maharashtra..रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती जाहीर..१४ एप्रिलला शहरात बाबासाहेबांच्या विचारांचा जागर
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र’तर्फे भव्य जयंती उत्सव साजरा करण्यासाठी समितीची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सुभेदारी विश्रामगृह येथे पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते ही निवड प्रक्रिया पार पडली.यंदाच्या जयंती महोत्सवासाठी सक्षम आणि उत्साही नेतृत्वाची निवड करण्यात आली असून, समिती पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे –
अध्यक्षपदी अर्शाद लखपती, कार्याध्यक्षपदी दिनेश गवळे, उपाध्यक्षपदी रवी मोरे तर स्वागताध्यक्षपदी रणजीत मनोरे यांची निवड करण्यात आली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी समितीच्या वतीने १४ एप्रिल रोजी शहरात भव्य वाहन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघणाऱ्या या रॅलीद्वारे बाबासाहेबांच्या विचारांचा व्यापक प्रसार आणि जागर केला जाणार असल्याची माहिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन लाभावे यासाठी मार्गदर्शक व सल्लागार मंडळाचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
मार्गदर्शक म्हणून राजुभाई साबळे, अविनाश थिट्टे, सुरेश शिनगारे, सुनील खरात, जयनाथ बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे.सल्लागार मंडळात प्रकाश घोरपडे, संतोष उनवणे, प्रदीप धनेधर, राजकुमार अमोलिक, हनु नाना, अनिस गंगापूरकर, जाहीर शेख, भीमराव गाडेकर यांचा समावेश आहे.तसेच समिती सदस्य म्हणून गणेश गौरये, शाहीद लखपती, अशोक गायकवाड, राजू उजगरे, कलीम खान यांची निवड करण्यात आली आहे.या भव्य जयंती उत्सवाच्या माध्यमातून शहरात सामाजिक एकात्मता, समता आणि न्यायाच्या मूल्यांचा संदेश पोहोचवण्याचा संकल्प समितीने व्यक्त केला आहे.
