जनतेच्या प्रश्नांना मिळणार आता तातडीने न्याय मुकुंदनगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रच्या कार्यालयाचे लोकार्पण..! पक्षाचे मुख्य नेते राजूभाई साबळे यांच्या हस्ते भव्य लोकार्पण सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):-जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे यांच्या पुढाकाराने, स्थानिक आणि जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत या उदात्त हेतूने मुकुंदनगर येथे नवीन जनसंपर्क कार्यालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे.या सोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली.या उद्घाटन प्रसंगी राज्य उपाध्यक्ष ॲड. अविनाश थिट्टे,मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हाध्यक्ष दिनेश गवळे,जिल्हा उपाध्यक्ष अरशाद लखपती, शहराध्यक्ष रणजीत मनोरे, अशोक गायकवाड आणि जयनाथ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाला शहर उपाध्यक्ष अनिस गंगापूरकर, संतोष उनवणे, हनु नाना, कलीम खान, गणेश गौरये, पायलट मोरे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महिला आघाडीच्या शकुंतला उनवणे,ज्योती सोनवणे,रमा म्हस्के आणि सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी प्रतिक्रिया देताना जिल्हा सरचिटणीस रविकांत मोरे म्हणाले की, “सामान्य नागरिकांना त्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आणि शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी हे कार्यालय सदैव तत्पर असेल.मुकुंदनगर परिसरातील विकासकामांना आता अधिक गती मिळेल.या कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्य नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र राजूभाई साबळे म्हणाले की,जनतेचे प्रश्न आणि शासकीय कामांमधील अडचणी सोडवणे प्रामुख्याने आम्हा सर्वांची जबाबदारी असेल.
