Crime..उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग यांच्या पथकाची मोठी कारवाई गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह एकाला अटक
अहिल्यानगर शनिशिंगणापूर (प्रतिनिधी):-अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध शनिशिंगणापूर पोलिसांनी कडक पाऊल उचलले असून, सोनई-शनिशिंगणापूर रोडवरील चारी नंबर ४ जवळ एका युवकाला गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह रंगेहाथ पकडण्यात आले आहे.अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना,त्यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,कृष्णा शिवाजी डावखर (वय २३,रा. शनिशिंगणापूर) हा युवक गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी चारी नंबर ४ परिसरात सापळा रचला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या कृष्णा डावखर याची पंचांसमक्ष झडती घेतली असता,त्याच्या कमरेला पॅन्टच्या आतील बाजूस ३०,००० रुपये किमतीचा एक सिल्व्हर रंगाचा गावठी कट्टा आणि खिशात २,००० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून आली.पोलिसांनी एकूण ३२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी पोहेकाँ/ १८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा डावखर विरुद्ध शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे गु.रं.नं. ५८/२०२६, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, या प्रकरणाचा पंचनामा ‘ई-साक्ष’ ॲपद्वारे नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे (श्रीरामपूर विभाग),अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे (अहिल्यानगर विभाग),आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु (शेवगाव उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या यशस्वी कारवाईत पोहेकाँ/१८५ ज्ञानेश्वर नामदेव शिंदे,पोहेकाँ/२१६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे,पोहेकाँ/१३३१ रमेश महादेव लबडे,पोकाँ/ १९०९ सागर अशोक शेजुळ, पोकाँ/१३६४ मृत्युंजय ज्ञानदेव मोरे,पोकाँ/ १४१ रविकांत बाबासाहेब गर्जे,सोनई पोलीस स्टेशनचे पोकाँ/२४२५ भगवान एकनाथ वाघमोडे आणि सायबर सेलचे पोकाँ/ ६४८ अरुण रघुनाथ सांगळे यांचा समावेश होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. एन. कारखेले हे करत आहेत.
