- Crime..वृद्ध आजीच्या उशाखालून मंगळसूत्र लांबवणारा ‘डोडो’ जेरबंद..! एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई..चोरीचा मुद्देमाल हस्तगत
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एमआयडीसी परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून,तिच्या उशाखाली डब्यात ठेवलेले मणी मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.करण उर्फ डोडो गौतम औताडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि ०६/०३/२०२६ च्या रात्री १०:०० ते ७ मार्चच्या पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.फिर्यादी महिला सौ.राजस दिपक पंचमुख (वय ६० वर्ष,रा.आदर्शनगर, एम.आय.डी.सी.अहिल्यानगर) या त्यांच्या घरात झोपलेल्या असताना,एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला.त्यांनी आपल्या उशाखाली एका डबीत काढून ठेवलेले सोन्याचे मणी मंगळसूत्र चोरट्याने हातसाफ करून लांबवले होते.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं १९२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केले. त्यातून हा गुन्हा आदर्शनगर येथीलच रहिवासी करण उर्फ डोडो गौतम औताडे (वय २२ वर्ष) याने केल्याचे निष्पन्न झाले.आरोपी ‘डोडो’ हा बालिकाश्रम रोड परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांना मिळाली.त्यानुसार पोलिसांनी तातडीने बालिकाश्रम रोड येथे सापळा लावला.पोलीस आल्याचे समजताच आरोपीने भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला,परंतु पोलीस पथकातील अंमलदारांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याला पकडले.कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला असून,चोरीला गेलेले मणी मंगळसूत्र पोलिसांनी त्याच्या कडून हस्तगत केले आहे.अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही धडाकेबाज कामगिरी श्री.सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे (अप्पर पोलीस अधीक्षक),श्री.शिरीष वमने (उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर ग्रामीण विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि:माणिक बी.चौधरी (प्रभारी अधिकारी, एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन),सफौ.राकेश खेडकर,पोहेकॉ.राजु सुद्रीक,सचिन आडबल,पोकॉ.नवनाथ दहिफळे, किशोर जाधव,अक्षय रोहोकले, सचिन हरदास,राहुल गुंडु,नितीन शिंदे यांनी केली असून या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
