Election..भाजपची विधानपरिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर..कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर..
प्रतिनिधी:-आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपली कंबर कसली असून, आज केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र आणि बिहारमधील उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.भाजपने आज दोन वेगवेगळ्या प्रेसनोट प्रसिद्ध करत द्विवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.महाराष्ट्रातील तसेच बिहारच्या आगामी विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ साठी भाजपने आपल्या ७ महत्त्वाच्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे.यामध्ये संघटन आणि स्थानिक पातळीवर पकड असलेल्या चेहऱ्यांचा समावेश आहे:
१)श्री.सुनील विनायक कर्जतकर (Shri Sunil Vinayak Karjatkar)
२)श्रीमती माधवी नाईक (Smt. Madhavi Naik)
३)श्री संजय नथ्थूजी भेंडे (Shri Sanjay Natthuji Bhende)
४)श्री विवेक बिपिनदादा कोल्हे (Shri Vivek Bipindada Kolhe)
५)श्री प्रमोद शांताराम जठार (Shri Pramod Shantaram Jathar)
६)प्रज्ञा सातव (pradyna satav)
तर बिहारमधून ७)श्री.सूर्य कुमार शर्मा (अरविंद शर्मा) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
केंद्रीय सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने ही अधिकृत यादी आज (२८ एप्रिल २०२६) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या उमेदवारी घोषणेनंतर आता महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे.
