कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई सराईत गुन्हेगार १ वर्षासाठी जेरबंद ‘एमपीडीए’ अंतर्गत नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात गुन्हेगारी कृत्यांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या आणि तडीपारीचा आदेश मोडून पुन्हा गंभीर गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराविरुद्ध अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नामे समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख (वय २७ वर्षे, रा. सबजेल चौक, अहिल्यानगर) याला जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये एम.पी.डी.ए. (MPDA) कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता स्थानबद्ध (jail) करण्यात आले असून,त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे करण्यात आली आहे.सराईत गुन्हेगार समीर उर्फ सॅम ख्वाजा शेख याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन तसेच अहिल्यानगर शहरातील इतर पोलीस स्टेशन येथे विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर यांचे आदेशाने त्याला अहिल्यानगर जिल्ह्याचे स्थळसिमेच्या हद्दीतून ०१ वर्षा करिता हद्दपार करण्यात आले होते.असे असताना देखील नमूद आरोपीने हद्दपारीचे आदेश मोडून अहिल्यानगर शहरात बेकायदेशीर प्रवेश केला व पुन्हा तीन गंभीर गुन्हे केले. त्याच्या या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आणि दहशतीला पायबंद घालण्यासाठी कोतवाली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे ठरवले.आरोपीला ०१ वर्षाकरीता स्थानबद्ध करणे कामी कोतवाली पोलीस स्टेशन कडून उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर व पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्फत जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावाचे अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी अहिल्यानगर यांनी दि. ०५/०६/२०२६ रोजी नमूद आरोपीस एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरीता स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले.आदेश मिळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.ही धडक कारवाई श्री.मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक,श्री. दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खाली पोनि श्री.संभाजी गायकवाड,पोउपनिरी श्री.प्रविण पाटील,सफौ.सुनिल शिरसाट,पोहेकॉ. विशाल दळवी,पो.हे.कॉ.बाळकृष्ण दौंड,पोहेकॉ.विनोद बोरगे,मपोहेकॉ.शिल्पा कांबळे,पोहेकॉ.साबीर शेख,पोहेकॉ.राहुल शिंदे,पोकॉ.दिपक रोहकले,पोकॉ.सत्यजित शिंदे,पोकॉ.सुरज कदम,पोकॉ.अमोल गाडे,पो.कॉअतुल लाटे,पो.कॉ.रमेश शिंदे,पोकॉ.संकेत थिवर,पोकॉ.संदिप कव्हळे,मपोकॉ.शिला डेरे,मोबाईल सेलचे.पोकॉ राहुल गुंडु,पोकॉ. अतुल काजळे,पोकॉ.शिरीष तरटे,पोकॉ दत्तात्रय कोतकर यांनी केली आहे.
