धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणारा कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात..सैनिक लॉन ते जुने कलेक्टर ऑफिस रस्त्यावर कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात धारदार शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करत रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली असून,त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष राजू गाडे (वय ४१,रा.तांबे मळा, व्हीआरडीई,बुरुडगाव,ता.जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार,आज दि. ०५/०६/२०२६ रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास पथक कायदे व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक (पोसई) प्रविण पाटील त्यांच्या सहकारी अंमलदारांसह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. दरम्यान,सैनिक लॉन ते जुने कलेक्टर ऑफिसकडे येणाऱ्या रोडवर एक इसम हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक यांना फोनद्वारे मिळाली.पोलीस निरीक्षकांनी तातडीने या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले.माहिती मिळताच पोसाई प्रविण पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तात्काळ सैनिक लॉन ते जुने कलेक्टर ऑफिस रस्त्याकडे धाव घेतली.तेथे संशयास्पद रितीने फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले.
दोन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक धारदार लोखंडी तलवार मिळून आली.पोलिसांनी नाव-गाव विचारले असता त्याने आपले नाव संतोष राजू गाडे (रा. बुरुडगाव) असल्याचे सांगितले.सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ/२५७३) सुरज दिलीप कदम यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५२९/२०२६, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची धडक कारवाई अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुबर्मे,नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड आणि त्यांच्या पथकातील पोसई प्रविण पाटील,पोहेकॉ राहुल शिंदे, पोहेकॉ/दोंड,पोहेकॉ विनोद बोरगे,पोहेकॉ विशाल दळवी,पोहेकॉ शाबीर शेख,पोकॉ दिपक रोहोकले,पोकॉ सत्यम शिंदे,पोकॉ सुरज कदम,पोकॉ अतुल काजळे,पोकॉ अमोल गाडे,पोकॉ रमेश शिंदे,पोकॉ शिरीष तरटे,पोकॉ दत्तात्रय कोतकर,पोकॉ सचिन लोळगे, पोकॉ संकेत धीवर,पोकॉ अतुल लाटे,मपोकॉ पल्लवी रोहोकले यांनी केली आहे.
