६ नामांकित हॉटेल्सवर एमआयडीसी पोलिसांचा एकाच वेळी छापा..’या’ हॉटेल्समध्ये रात्री चालायचं तरी काय?
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या काळ्या धंद्यावर अहिल्यानगर पोलिसांनी रविवारी (दि.९ जून २०२६ रोजी) मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. एकाच वेळी तब्बल ६ वेगवेगळ्या नामांकित हॉटेल्सवर छापेमारी करत पोलिसांनी २३,३८५ रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे पार दणाणले आहेत.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन यांनी राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि माणिक चौधरी यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली.पोलिसांनी वेगवेगळ्या ६ ठिकाणी छापे टाकून ६ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून देशी-विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
’या’ हॉटेल्सवर पडली धाड आरोपींची नावे जाहीर:
१. हॉटेल ऋषिकेश (वांबोरी): आरोपी तुषार बाळासाहेब सुगारे (वय २४, रा. वांबोरी) याच्या ताब्यातून ४,०४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त.
२. हॉटेल जगदंब (वांबोरी): आरोपी महेश सुखदेव साळुंके (वय ३०, रा. वांबोरी) याच्याकडून ५,३२० रुपयांची विदेशी दारू जप्त.
३. हॉटेल साक्षी (राहुरी ते शनी शिंगणापूर रोड): आरोपी प्रमोद बापूसाहेब म्हसे (वय ३२, रा. कोंढवड) याच्याकडून ७,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
४. हॉटेल निसर्ग (ब्राह्मणी): आरोपी राजेंद्र राधाकिसन जाधव (वय ६०, रा. ब्राह्मणी) याच्याकडून १,९०० रुपयांची विदेशी दारू जप्त.
५. हॉटेल गुरुकृपा (मोकळ ओहोळ): आरोपी सागर आदिनाथ ससे (वय ३१, रा. ससे गोधळे वस्ती, वांबोरी) याच्याकडून २,७१० रुपयांचा माल जप्त.
६. हॉटेल शेतकरी (ब्राह्मणी): आरोपी सूर्यभान चंद्रभान तांदळे (वय ४६, रा. ब्राह्मणी) याच्याकडून २,३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण २३,३८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.सर्व ६ आरोपीं विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये ६ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपासासाठी आरोपींना राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्माका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सपोनि माणिक बी.चौधरी, पोसई.विकास जाधव,सफो. राकेश खेडकर,पोहेकॉ.राजू सुद्रिक,पोहेकॉ.विशाल थोरात, पोहेकॉ.आदिनाथ पालवे, पोहेकॉ.सुशांत दिवटे,पोहेकॉ. संदिप पितळे,पोहेकॉ.सुभाष म्हस्के,पोना.पोपट आढाव, पोकों.किशोर जाधव,पोकों. सचिन नागरे,पोकों.सचिन हरदास,पोकों.राजेश राठोड, पोकों.जयसिंग शिंदे आणि पोकों.सुरज देशमुख यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
