तोफखाना पोलीस निरीक्षक वैद्य ॲक्शन मोडमध्ये.. महागडी इलेक्ट्रिक वायर चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तोफखाना पोलीस स्टेशनचा पदभार पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य यांनी घेतल्यापासून गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवायांचे सत्र सुरू झाले आहे.शहरातील गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलीस निरीक्षक वैद्य यांनी दिलेल्या कडक सूचना आणि मार्गदर्शनानुसार,तोफखाना गुन्हे शोध पथकाने (DB Team) बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ₹१०,०००/- किमतीची चोरीची इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे.दि. ३०/०५/२०२६ रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजी. नं. ४३६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून इलेक्ट्रिक वायर चोरीला गेली होती.पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर व पोलीस अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करत होते. दरम्यान,गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांना संशयित आरोपींची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले करण मनोज पवार (वय ३१ वर्षे,रा.संजय नगर,मारुती मंदिर,कोपरगाव,ता.जि. अहिल्यानगर,ऋत्विक सुनिल पवार (वय २० वर्षे, रा.सोनई, ता.जि.अहिल्यानगर) असे पकडलेला आरोपीचे नावे आहेत.सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्याकडून चोरीची वायर जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास म.पो.हे.कॉ संजिवनी नेटके करत आहेत.सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.बालाजी वैद्य, गुन्हे शोध पथकाचे PSI योगेश चाहेर पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे,भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार,सुधीर खाडे,सुरज वाबळे,पो.कॉ सुमित गवळी,अविनाश बर्डे, सतिष त्रिभुवन,सुजय हिवाळे, भागवत बांगर,सतिष शिंदे, शाकीर सय्यद,बाळासाहेब भापसे,कपिल गायकवाड, म.पो.ना जिजा खुडे यांच्या पथकाने केली.तसेच या गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात दक्षिण मोबाईल सेलचे पो.कॉ राहुल गुंडू,नितीन शिंदे,अरुण सांगळे यांनी मोलाची मदत केली.पोलीस निरीक्षक वैद्य यांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचे कौतुक होत असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
