एलसीबीचा दणका..! गुटख्याच्या अड्ड्यांवर ५ ठिकाणी धाडी ८ जणांवर गुन्हे दाखल…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने धडक मोहीम उघडली आहे.एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सोनई व बेलवंडी हद्दीत तब्बल ५ ठिकाणी अचानक छापे टाकून ८९,३६६ रुपयांचा सुगंधी तंबाखू,मावा व गुटखा जप्त केला.या कारवाईने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.शब्बीर महेताब सय्यद (वय ४५,रा.सोनई, ता. नेवासा),जावेद उस्मान शेख (वय ५२,रा.हलवाई गल्ली, सोनई),सोमनाथ उर्फ गणेश प्रकाश घोरपडे (वय ३५,रा. चिंभळा,ता.श्रीगोंदा),संकेत अशोक पाचपुते (रा.काष्टी – फरार),विजय सतीष चोरडिया (वय ३३,रा.चिंभळा,ता. श्रीगोंदा),कमलेश मुरली कृपालीनी (रा.दौंड फरार),जाकीर इसाक शेख (वय ३९, रा.बेलवंडी,ता.श्रीगोंदा),फयाज तांबोळी (रा.अहिल्यानगर – फरार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित इसमांची नावे आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले,अतुल लोटके,विकास साळवे,सतीष भवर,गणेश लोंढे,रोहित येमुल, बाळासाहेब गुंजाळ,रणजीत जाधव,शामसुंदर जाधव, प्रताप देवकाते,मनोज साखरे, अमोल आजबे,प्रकाश मांडगे व अमोल कोतकर यांनी केली आहे.
