LCB..जिल्ह्यात गुटखा माफियांचे कंबरडे मोडले..एकाच दिवशी तब्बल ८ छापे १३ जणांवर गुन्हे दाखल लाखोंचा मुद्देमाल जप्त..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अवैध सुगंधित तंबाखू,गुटखा आणि मावा विक्री करणाऱ्या तस्करांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक मोहीम राबवत गुन्हेगारांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या चार विशेष पथकांनी मिरजगाव,नेवासा,राहाता आणि राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच वेळी ८ ठिकाणी छापे टाकले.या धाडसी कारवाईत १३ आरोपीं विरुद्ध ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३ लाख १८ हजार २८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
धनंजय वसंत सातव (वय ४५,रा. पिरसाहेब गल्ली,मिरजगाव), दादा नारायण गदादे (रा. गुरवपिंप्री रोड,मिरजगाव – फरार),सागर हनुमंत गोरे (वय २९, रा. गोरे मळा, गोंधर्डी रोड, कर्जत),बाळासाहेब रावसाहेब जावळे (वय ३५,रा. बाजारतळ कुकाणा) व बाबु उर्फ बबलू पठाण (रा. शेवगाव),अबरार रशीद शेख (वय ४०,रा. देवगाव रोड,कुकाणा),आसिफ तांबोळी (रा.शेवगाव फरार),इम्रान शफी तांबोळी (वय ३५),जमीर शफी तांबोळी (वय ३८) व पापाभाई नजीर शेख (वय ५३, तिघे रा.शनी मंदिर रोड,मेहेत्रेनगर,राहाता),बाबासाहेब भाऊराव गागरे (वय ४३, रा. म्हैसगाव, राहुरी) व पवन गिरासे (रा. राहुरी – फरार),पवन उर्फ पृथ्वीराज दगडूसिंग गिरासे (वय ३१, रा. राहुरी) या सर्व आरोपींवर नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाईपोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार अरुण गांगुर्डे,रोहित मिसाळ,मनोज साखरे,भाऊसाहेब काळे, प्रकाश मांडगे,दीपक जाधव, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे,अभिजीत अरकल,विष्णू भागवत, अशोक लिपणे,किशोर शिरसाठ,विजय पवार,रिचर्ड गायकवाड,राहुल डोके, भगवान थोरात,सुनील पवार, शाहीद शेख,भीमराज खर्से,विशाल तनपुरे,आजिनाथ पाखरे,अमृत आढाव आणि महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे यांनी ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांमध्ये या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली असून फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
