कोतवाली पोलिसांच्या एकाच दिवसात ३ वेगवेगळ्या मोठ्या कारवाया नशाचे बॉटल,गांजा चोरी गेलेले मोबाईल हस्तगत..वाचा सविस्तर..
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी)-अहिल्यानगर शहर व उपनगर परिसरात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कोतवाली पोलिसांनी एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या धडाकेबाज कारवाया करत अवैध धंदे करणाऱ्यांना जबरदस्त दणका दिला आहे.या मोहिमेत तरुणांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असणाऱ्या मेफेनटरमाईनच्या ४० नश Spectacle बाटल्या, केडगावमधून १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे १८.२५ किलो वजनाचे गांजाचे झाड आणि पुणे बसस्थानक परिसरातून चोरी झालेले महागडे मोबाईल हस्तगत करण्यात कोतवाली पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे.पहिली कारवाई गांधी मैदानात तरुणाईला नशेत लोटणारे मेफेनटरमाईन इंजेक्शन रॅकेट उद्ध्वस्त अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान, मार्कंडेय शाळेजवळ मोकळ्या जागेत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकता न येणाऱ्या व तरुणाईला व्यसनाच्या आहारी नेणाऱ्या नश Spectacle औषधांची बेकायदेशीर विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना मिळाली होती.पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तात्काळ पंचांसमक्ष छापा टाकला.त्या ठिकाणी काळ्या रंगाची कापडी पिशवी घेऊन उभ्या असलेल्या प्रताप अशोक अकोलकर (वय २१, रा. करंजी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर)
तेजस गंगाधर वारुळे (वय २१, रा. तपोवन रोड, अहिल्यानगर) तेजस अमित उळागड्डे (वय २२, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी,ता. जि. अहिल्यानगर) अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून १५ हजार रुपये किमतीच्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA नावाच्या प्रत्येकी १० मिली क्षमतेच्या ४० बाटल्या आणि २० हजार रुपये किमतीची होंडा पॅशन प्लस दुचाकी (क्रमांक: MH १६ AN ८८९६) असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, १२५, २७८, ३(५) व औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई गणेश देशमुख करत आहेत.तर दुसरी कारवाई केडगावमध्ये घराच्या आवारात लावले गांजाचे झाड १ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
केडगाव परिसरातील वैष्णवनगर,तिरंगा चौक येथे एका इसमाने आपल्या राहत्या घराच्या आवारात कोणतीही शासकीय परवानगी न घेता विक्रीच्या उद्देशाने गांजाचे झाड लावल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली.त्यांच्या आदेशावरून सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी छापा टाकला असता घराच्या कंपाऊंडमध्ये गांजाचे झाड आढळून आले.पोलिसांनी ते झाड जप्त करत आरोपी विकास बाळू उमाप (वय ३५, रा.तिरंगा चौक,वैष्णवनगर, केडगाव,ता.जि.अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून १८.२५ किलोग्रॅम वजनाचा, अंदाजे १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं. ८४३/२०२६, एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम ८(ब), २०(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी कुणाल सपकाळे करत आहेत.व तिसरी कारवाई पुणे बस स्थानकावरून मोबाईल चोरणारा झारखंडचा आरोपी गजाआड फिर्यादी भास्कर गंगाधर जाधव (रा.लोहगाव, ता.नेवासा,जि.अहिल्यानगर) यांचे पुणे बसस्थानक परिसरातून ७८ हजार रुपये किमतीचे मोबाईल चोरीला गेले होते.याबाबत गु.र.नं. ८४०/२०२६, BNS कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल होता.कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत आरोपी मोहम्मद इम्रान मोहम्मद जुबेर शेख (वय २१,रा.महाराजपूर,लिटल फ्लॉवर ॲकॅडमी जवळ, साहेबगंज,राज्य – झारखंड) याला शिताफीने ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीस गेलेले मोबाईल हस्तगत करण्यात यश मिळवले.या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेकॉ.सूर्यकांत डाके करत आहेत.सदरची उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी (नगर शहर) विभाग दिलीप टिपरसे,आणि प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.या कारवाईत
सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे,पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळकृष्ण दौड,मपोहेकॉ. रोहिणी दरंदले,पोहेकॉ.राहुल शिंदे,विनोद बोरगे,साबीर शेख, विशाल दळवी,दशरथ थोरात,दीपक रोहकले,शिरीष तरटे,सुरज कदम,सत्यम शिंदे,दत्तात्रय कोतकर,अतुल काजळे, अमोल गाडे,सचिन लोळगे, महेश पवार,रमेश शिंदे,संकेत धिवर,अतुल लाटे,राहुल मासाळकर,गंगाधर आंग्रे, मपोकॉ.पल्लवी रोहकले, तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू व अरुण सांगळे यांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला होता.
