स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १४ गोवंशांची सुटका ५ जण फरार..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-संगमनेर तालुक्यातील कुरण शिवारात कत्तलीच्या उद्देशाने पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या तब्बल १४ गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून सुटका केली मात्र पोलिसांची चाहूल लागताच पाचही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विकास जाधव यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
कुरण शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे कोंडल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने छापा टाकला.तेथून १ लाख रुपये किमतीची १४ जनावरे जप्त करण्यात आली.याप्रकरणी जमील उर्फ जमालुद्दीन,अशपाक राजू शेख,तनवीर मुन्ना पठाण,आदिल शेख,सलमान शेख (सर्व राहणार कुरण, तालुका संगमनेर) या फरार आरोपीं विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागवणे व महाराष्ट्र पशुसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि.विकास जाधव,पोलीस अंमलदार विजय पवार,रिचर्ड गायकवाड, राहुल डोके,भगवान थोरात, सुनिल मालणकर व महादेव भांड यांनी केली आहे पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
