माजी विद्यार्थ्याची शाळेप्रती कृतज्ञता! हिवरगाव पावसा जिल्हा परिषद शाळेला १ लाख रुपयांचे संगणक संच भेट..
संगमनेर (प्रतिनिधी/नितीनचंद्र भालेराव)::-ज्या शाळेत बालपणीचे प्राथमिक शिक्षण घेतले,ज्या मातीने घडवले त्या शाळेप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत हिवरगाव पावसा येथील माजी विद्यार्थी विठ्ठल साईराम पावसे यांनी शाळेला सुमारे एक लाख रुपये किमतीचे ५ अद्ययावत संगणक संच भेट दिले आहेत. ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारल्या जाणाऱ्या आय.सी.टी. (ICT) लॅबसाठी ही मोलाची मदत करण्यात आली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.गावातील ज्येष्ठ नागरिक साईराम (काकाजी) भिका पावसे यांचे ज्येष्ठ चिरंजीव विठ्ठल पावसे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी डिजिटल शिक्षणात मागे राहू नयेत, या हेतूने पुढाकार घेत हे संगणक संच उपलब्ध करून दिले.शाळेचे मुख्याध्यापक आर.पी.राहणे यांच्या पदभार स्वीकारल्यापासून गेल्या वर्षभरात शाळेचा कायापालट करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हिवरगाव पावसा जिल्हापरिषद प्राथमिक शाळा तालुक्यात ‘उपक्रमशील शाळा’ म्हणून नावारूपास येत आहे.लवकरच या नव्या आय.सी.टी. लॅबचे औपचारिक उद्घाटन करून ही संगणक सुविधा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी खुली केली जाणार आहे.शाळेच्या जुन्या चार वर्गखोल्यांचे निर्लेखन पूर्ण झाले असून सध्या दोन नवीन वर्गखोल्यांचे काम प्रगतीपथावर आहे.भविष्यात शाळेची भव्य व सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,खासदार भाऊसाहेब वाकचौरे,आमदार अमोल खताळ तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या सहकार्यातून निधी मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्याध्यापक राहणे यांनी दिली.
शाळेला मोलाचे योगदान दिल्याबद्दल संगमनेर तालुका गटशिक्षणाधिकारी गुंड, विस्तार अधिकारी श्रीमती नंदा वलवे आणि केंद्रप्रमुख रुपेश वाकचौरे यांनी विठ्ठल पावसे यांचे अभिनंदन केले.
तसेच या दातृत्वाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पावसे,उपाध्यक्ष सोमनाथ भालेराव, सरपंच सुभाष गडाख, उपसरपंच सुजाता दवंगे, ग्रामविकास अधिकारी हरीश गडाख, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष गणपतराव पावसे, दूध संघाचे संचालक डॉ. प्रमोद पावसे, सरपंच सेवा संघाचे संस्थापक यादवराव पावसे, काशिनाथ पावसे, गणेश दवंगे, केशव दवंगे, प्रा. बाबुराव पावसे, किरण पावसे, हॉटेल मयूरचे संचालक रामनाथ पावसे, डॉ. संदीप पावसे, डॉ.रमेश पावसे, नितीन भालेराव, रामनाथ गडाख,अनिल गडाख, प्रवीण गडाख, मच्छिंद्र पावसे, आप्पासाहेब गडाख, दिगंबर पावसे, सचिन सस्कर, सचिन चंद्रकांत पावसे, गोकुळ गडाख, संदीप पावसे, नारायण पावसे, सुशीला पावसे, मंगल पावसे, सुवर्णा हासे, भीमाशंकर पावसे यांच्यासह मुख्याध्यापक आर. पी. राहणे, शिक्षक राजेश नवले, हरिभाऊ सहाने, श्रीमती मीनल बिडवे व सेमी बालवाडीच्या शिक्षिका प्रतिभा वाकचौरे यांनी विठ्ठल पावसे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
