‘त्या’ हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर ‘एलसीबी’ चा छापा; ८ जुगाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-जिल्ह्यात अवैध धंदे आणि जुगार चालवणाऱ्यांवर अहिल्यानगर पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अचानक छापा टाकून जुगाराचा डाव उधळून लावला.या कारवाईत पोलिसांनी ८ जणांना रंगेहाथ ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम,५ महागडे मोबाईल आणि ५ मोटारसायकलींसह तब्बल ३ लाख ४४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सक्त आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहेत.या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक राहुरी हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली “गंगापूर शिवारातील एस. के. पेपर मिलच्या समोरील पत्र्याच्या शेडमध्ये रामदास नान्नोर हा व्यक्ती पैशांवर मोठा जुगार खेळत व खेळवत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पंचांसह घटनास्थळी धाव घेतली.
पत्र्याच्या शेडमध्ये गोलाकार बसून पैशांची मोठी पैज लावून जुगार खेळत असतानाच पथकाने चहूबाजूंनी घेरून छापा टाकला.पोलिसांना पाहताच जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली,मात्र सतर्क पोलिसांनी सर्वांची नाकेबंदी करतज्ञानेश्वर पुंजा पवार (वय ३४, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी)
२) अनिल दत्तात्रय होडगर (वय २९, रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी)
३) चिमा खंडु वडीतके (वय ४५, रा. गंगापूर, ता. राहुरी)
४) बाळासाहेब विठ्ठल तुपे (वय ६०, रा. गळनिंब, ता. श्रीरामपूर)
५) मनोहर रामदास नान्नोर (वय ३८, रा. गंगापूर, ता. राहुरी)
६) किरण साहेबराव होण (वय ३६, रा. कडित, ता. श्रीरामपूर)
७) विठ्ठल बाळासाहेब चितळकर (वय ३८, रा. मांडवे, ता. श्रीरामपूर)
८) रामदास रावजी नान्नोर (वय ६८, रा. गंगापूर, ता. राहुरी) या ८ जणांना जागीच ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०२२/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोलीस अंमलदार सुनील पवार,गणेश धोत्रे,अजिनाथ पाखरे, रमीजराजा आतार व विशाल तनपुरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
