हॉटेल किनारा परिसरात गावठी कट्ट्यासह दबा धरून बसलेल्या तरुणावर LCB चा छापा धक्कादायक माहिती समोर..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एमआयडीसी हद्दीतील दूध डेअरी चौक ते शेंडी जाणाऱ्या रस्त्यावरील ‘हॉटेल किनारा’ परिसरात गावठी कट्टा कमरेला लावून फिरणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने फिल्मी स्टाईलने सापळा रचून जेरबंद केले.त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.जिल्ह्यातील बेकायदेशीर अग्निशस्त्रांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय ठोंबरे,विष्णु भागवत,संदिप पवार, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे आणि सतीष भवर यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते.हॉटेल किनाऱ्यासमोर एक तरुण गावठी कट्ट्यासह उभा असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळताच पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला.या कारवाईत संशयित सुमित सॅमसन ठोसरे (वय २७,रा. गणेश चौक,बोल्हेगाव फाटा,एमआयडीसी,ता.जि. अहिल्यानगर मूळ रा.नागापूर) याला ताब्यात घेण्यात आले. 
झडती दरम्यान त्याच्याकडून ४० हजारांचा गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला.पोलिसी खाक्या दाखवताच,हे शस्त्र जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा.पितळे कॉलनी, बोल्हेगाव,ता.जि. अहिल्यानगर) याच्याकडून घेतल्याची कबुली ठोसरेने दिली.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ७२९/२०२६) दाखल करण्यात आला असून,फरार आरोपी जितेंद्रसिंह राठोडचा पोलीस शोध घेत आहेत.
