एमआयडीसी परिसरात टपऱ्यांवर देशी,विदेशी,हातभट्टी दारू विकणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मार्च):-एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत एमआयडीसी भागात टपरीवर तसेच इतर ठिकाणी काही महिला व इसम विनापरवाना देशी विदेशी,तसेच गावठी हातभट्टीची दारुची चोरुन विक्री करत होते.मात्र एमआयडीसी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून ४२३६०/-रू.किमतीचा मुददेमाल जप्त केला आहे.ही कारवाई दि.३० मार्च २०२३ रोजी एमआयडीसी पोलिसांनी केली आहे.एमआयडीसी स्टेशन मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षकअहमदनगर,श्री.अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/राजेद्र गायकवाड,सफो/रावसाहेब लोखंडे,पोना/चांगदेव आंधळे,पोना/पालवे,पोकॉ/किशोर जाधव,पोकॉ/प्रशांत धुमाळ,पोकॉ/नवनाथ दहिफळे यांनी केली आहे.