मोटरसायकल चोरणाऱ्यास मुद्देमालासह पकडले तोफखाना पोलिसांची कारवाई;चोरी केलेल्या तीन मोटरसायकल ताब्यात
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मार्च):-चोरीच्या तीन दुचाकीसह एकास तोफखाना पोलिसांनी पकडले,तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार होणाऱ्या दुचाकी चोऱ्या यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोध पथकाचे पोसई/समाधान सोळंके व त्यांच्या पथकाला कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते.नमूद आदेशाप्रमाणे पथकाने तपास करून इसम नामे शेख अजरुद्दीन महेबुब ऊर्फ पेंटर (वय ३०.वर्षे रा.मुकुंदनगर अहमदनगर) यास ताब्यात घेऊन त्याकडून खालील प्रमाणे मोटार सायकल जप्त केल्या.तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं- ३१४/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे
१)२०,०००/- रु किंमतीची काळया रंगाची त्यावर निळे पट्टे असलेली हिरो होडा कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल नंबर एम एच १४ ए डब्लु ४४४९ असा असलेली
चेसी नंबर ०६G१६F२२००९ इंजिन नंबर ०६G१५E२०२३५
तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं १९/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे
२)१,५०,०००/- रु किंमतीची फिक्कट पिवळे रंगाची एक रॉयल इनफिल्ड कंपनीची बुलेट मोटार सायकल विना क्रमांकाची जुनी वापरती चेसी नंबर ME३U३S५०२KL७५६९१४ इंजिन नंबर U३S५C२KL६८९७२२
तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं- १९१०/२०२२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे
३)४०,०००/- रु मोटार सायकल नंबर एम एच १७ CF ३५६५ चेसी नंबर MLBHR०५१J५L००२३२ इंजिन नंबर HA११EPJ५L००२२१
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/श्री मधुकर साळवे,पोसई/श्री.समाधान सोळंके,पो.हे.कॉ/दत्तात्रय जपे,सुनिल शिरसाट, पोना/सुरज वाबळे,पोना/ वसीम पठाण,पोना/अहमद इनामदार,पोना/संजय इरनक, पोना/अविनाश वाकचौरे, पोकॉ/सचीन जगताप,शिरीष तरटे,हरीदास कोतकर,संदिप गि-हे,पोकॉ/सतीष त्रिभुवन, पोकॉ/सतीश भवर यांनी केली आहे.