जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना चार कोटी रुपयांचा निधी मंजूर खा.डॉ.सुजय विखे पाटील
अहमदनगर प्रतिनिधी(दि.३१ मार्च):-प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील सहा पर्यटन क्षेत्रास चार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असल्याची माहिती खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.जिल्ह्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ,केडगाव येथील रेणुकामाता देवस्थान मंदिर,जवळा येथील जवळेश्वर मंदिर,श्रीगोंदा येथील शेख मोहम्मद महाराज मंदिर, पाथर्डी येथील वृध्देश्वर देवस्थान आणि शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील गणपती मंदिर सुशोभीकरनासाठी असे एकूण चार कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे.या भागातील ग्रामस्थ या मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाची मागणी सातत्याने करत होते त्यामुळे या करिता हा निधी विशेष प्रयत्न करून मंजूर केला असल्याचे खा.विखे पाटील यांनी सांगितले.दरम्यान या मंदिर परिसराचे सुशोभिकरण आता चांगल्या पद्धतीने होणार असल्याने या भागातील ग्रामस्थांनी खा.डॉ.सुजय विखे यांचे आभार मानले आहेत.