वीज मीटर जोडून देण्यासाठी सहाय्यक अभियंत्यांने मागितली लाच नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मार्च):-लाच मागणी गुन्हा अहवाल
▶️ *युनिट -* अहमदनगर
▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय- 31, अंभोरा तालुका आष्टी,जिल्हा बीड
▶️ आरोपी-कमलेश युवराज पवार,वय 29,सहायक अभियंता,वर्ग 2.म रा वि वि कंपनी मर्या,सब स्टेशन चिचोंडी पाटील,ता.नगर,हल्ली राहणार-दिपक काळे यांचे येथे भाड़याने,शुभ रेसीडेंसी,नवले नगर,पारिजात चौक,सावेडी,अहमदनगर.मुळ रा.प्लॉट न 120, सी 2 भवनच्या पाठीमागे,खुटवड नगर,नाशिक
▶️ *लाचेची मागणी-* 50000/-₹
तडजोड अंती मागणी – 20000/- ₹
▶️ *लाचेची मागणी तारीख-*24/03/2023
▶️ *लाचेचे कारण* – यातील तक्रारदार यांचे अंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीड, येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे सदर ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडी पाटील,यांच्याकडून विद्युत कनेक्शन घेतलेले आहे.सदर कनेक्शनच्या मीटर मध्ये काहीतरी छेडछाड केले म्हणून सदर मीटर तपासणी करिता यातील आरोपी लोकसेवक यांनी काढून नेले होते.सदर मीटर पुन्हा जोडून देण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे आलसे यांचे वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्या करिता ₹ 50000/- ची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिली होती. सदर तक्रारीवरून लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोड अंती 20000/- हजार रुपये मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून नगर तालुका पोलीस ठाणे येथे दिनांक 30/03/2023 रोजी रात्री उशीरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आरोपी लोकसेवक याना ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️हॅश व्हॅल्यू,घेण्यात आली आहे
▶️ सापळा अधिकारी:- पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे
▶️ सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक शरद गोरडे
▶️पर्यवेक्षण अधिकारी- हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक,ला प्र वि अहमदनगर
▶️ *सापळा पथक* :- पोलीस अंमलदार वैभव पांढरे,बाबासाहेब कराड, राधा खेमनार,चालक पोलिस हवालदार दशरथ लाड
▶️ **मार्गदर्शक*
शर्मिष्ठा वालावलकर मॅडम,पोलीस अधीक्षक
*श्री नारायण न्याहळदे
अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि,नाशिक.
नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक,ला.प्र.वि. नाशिक.
▶️ *आरोपीचे सक्षम अधिकारी*मुख्य व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, प्रकाशगड,मुंबई.————————————
सर्व नागरिकाना आवाहन करण्यात येते की,आपणास कोणी लोकसेवक शासकिय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तर अँटी करप्शन ब्यूरो अहमदनगर
टोल फ्री क्रमांक १०६४ आणि दूरध्वनी क्रमांक ०२४१/ २४३२६७७ वर संपर्क करावा.