अफवांवर विश्वास ठेऊ नये एसपी राकेश ओला ; झालेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला
अहमदनगर प्रतिनिधी (दि.५ एप्रिल):-गजराज नगर वारुळवाडी येथे आपापसातील वादातून एका गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.तसेच येथे काही मुलांमध्येही वाद झाला आहे परंतु या वादाचे रूपांतर धार्मिकतेकडे काहीजण नेत आहेत.त्यामध्ये काही लोक जखमी झाले असून ते सिविल हॉस्पिटल मध्येही ऍडमिट झाले आहे.त्यांच्यावर तेथे उपचार योग्य रीतीने सुरू आहेत.परंतु काही लोक झालेल्या घटनेच्या खूप मोठ्या प्रमाणात अफवा पसरत आहे तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले आहे.पोलिसांचा तपास सुरूच आहे व झालेल्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.