चाकूचा धाक दाखवत १ लाख ३५ हजार रुपये कॅश व लॅपटॉप लंपास तोफखान्यात गुन्हा दाखल
अहमदनगर प्रतिनिधी(दि.५ एप्रिल):-पाईपलाईन रोडवरील अयोध्या नगर येथे फिर्यादी (कृष्णकांत शंकर मडूर रा.जंगुभाई तालीम तोफखाना) हे आपल्या भावाच्या घरी दुचाकीवरून भारत पेट्रोलपंपाच्या मागून जात असताना तेथे स्पीड ब्रेकर असल्यामुळे फिर्यादी यांच्या मोटरसायकलचा स्पीड कमी झाला त्यावेळी एक अनोळखी इसम हा फिर्यादी यांच्या जवळ येऊन त्यांना शिवीगाळ करू लागला व त्याच वेळी आणखी एक दुसरा इसम तेथे आला व त्याने त्याच्या हातातील चाकूने धाक दाखवून फिर्यादी यांच्या पाठीवरील बॅगेतून १,३५,००० रु.कॅश व लॅपटॉप चोरून घेऊन गेला.ही घटना मंगळवार दि.४ एप्रिल रोजी घडली असून लक्ष्मीकांत शंकर मडूर यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुरनं ३७७/२०२३ भादविक ३९२,३४ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सापोनि/नितीन रणदिवे हे करीत आहेत.