Maharashtra247

आ.नितेश राणेंवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड;जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगर शहरात येण्यास प्रशासनाने रोखावे-आव्हाड

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१९ एप्रिल):-दि.१८ एप्रिल रोजी भाजपा आमदार नितेश राणे यांनी नगर शहरातील कापडबाजार येथे चौक सभे दरम्यान भाषण करत असतांना महापालिकेचे आयुक्त यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन महापालिकेचे आयुक्त अल्पसंख्यांक लोकांची बाजू घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात,त्यांना ते कसे वाचवतात ते मी बघतोच अशी धमकी दिली. नगरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन गटात किंवा दोन व्यक्तींमध्ये हे व्यक्तीगत वाद असून यामध्ये नितेश राणे येऊन दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल व शहराची शांतता, सुव्यवस्था ही कशी बिघडावी यासाठी त्यांनी दोन ते चार वेळेस दौरे करुन निवडणुकीच्या तोंडावर भडकाऊ भाषण करुन शहरातील लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे.शहरातील आमदार श्री. संग्राम जगताप हे नगर शहरातून दोन वेळेस आमदार झाले तेव्हा पासून आज तागायत शहरात हिंदू मुस्लिम दंगल या घडल्याच नाही उलट त्यांनी या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम केले आहे. मनपा आयुक्त यांच्यावर शिवीगाळ करुन शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा नितेश राणे यांनी प्रयत्न केला आहे.शहरातील बेरोजगारांचा प्रश्न इतका गंभीर असून नितेश राणे यांनी शहर सुधारण्यासाठी व शहरातील बेरोजगार तरुणांना नोकरी धंद्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्याऐवजी त्यांना गुन्हेगारी वृत्तीकडे कसे ढकलता येईल त्या तरुणांचे घरे कसे उध्वस्त होईल याकडे नितेश राणे यांनी कट रचला आहे.तरी अशा प्रवृत्तीच्या लोकांनी अहमदनगर शहरामध्ये लायकी नसलेल्या लोकांनी शहरामध्ये येऊन शहराची शांतता व सुव्यवस्था भंग करु नये.शहरामध्ये यायचे असेल तर बेरोजगारांसाठी उद्योग धंदे घेऊन यावे व त्यांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा व शहराच्या विकासासाठी हातभार लावावा.अन्यथा अशा वृत्तीच्या लोकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षातर्फे जशास तसे उत्तर देण्यात येईल याची जबाबदारी आयोजकांनी व जे शहरात शांतता व सुव्यवस्थेचा भंग करतील अशांनी स्वत:घ्यावी.अन्यथा आमच्या स्टाईलने त्यांना उत्तर देण्यात येईल.नगर शहरात मिळेल ते काम म्हणजेच हातावरच पोट असलेले नागरिक जास्त राहतात त्यांचाही या निमित्ताने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.व अशा अर्वाच भाषेत बोलणाऱ्या लोकप्रतिनिधींना नगर शहरात येण्यासाठीच प्रशासनाने मज्जाव करावा असे यावेळी रोहित आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर ही ताशेरे ओढले पोलिसांवरही राज्य सरकारचा खूप दबाव आहे असेही ते यावेळेस म्हणाले.मनपा आयुक्तांना नितेश राणे यांनी जी शिवीगाळ केली त्यांचे विरुध्द अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा प्रशासनाने दाखल करावा आणि जर गुन्हा दाखल केला नाही तर कधीही कोणत्याही ठिकाणी उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.मग त्यापासुन होणाऱ्या परिणामाची संपुर्ण जबाबदारी पोलिस प्रशासनावर राहिल.अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख रोहित आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी शहराध्यक्ष हरिष आल्हाट,सामाजिक कार्यकर्ता संजय कांबळे,युवक शहराध्यक्ष संदीप वाघमारे,अतुल शिंदे,दिलीप कांबळे,व व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page