सातारा प्रतिनिधी(दि.१९ एप्रिल):-नवी मुंबई खारघर येथे १६ एप्रिल २०२३ या दिवशी भर दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ज्या दिवशी ज्यावेळी प्रदान करण्यात आला त्या दिवशी बाहेरून आलेले प्रेक्षक अति प्रमाणात होते व त्यांच्या खाण्यापिण्याची सोय संयोजक आयोजक व मॅनेजमेंट विभागाने करायला पाहिजे होती पण ती त्यांनी केली नव्हती तसेच त्यावेळी त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये 38 टक्के सेल्सिअस उष्णता होती.अशा उष्णतेत संयोजक आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित करायला नको होता.तसेच हा कार्यक्रम राजभवनात करायला पाहिजे होता कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा कोणताही पुरस्कार देते तेव्हा तो राजभवनात किंवा शासकीय कार्यालयामध्ये झाला पाहिजे होता पण तसे न होता संयोजक आयोजक व महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार सार्वजनिक ठिकाणी व मोकळ्या जागेत आयोजित केला.तसेच त्यांनी फक्त जिथे व्यासपीठ होते तिथेच छत लावले होते.नागरिक आणि प्रेक्षक तिथे होते तिथे छत बिलकुल नव्हते प्रेक्षक जिथे बसले होते तिथे त्यांनी मंडप लावायला पाहिजे होता पण लावला नव्हता.नागरिक आणि प्रेक्षक तिथे जेव्हा येतात तेव्हा त्यांची संपूर्णपणे जबाबदारी ही संयोजक आयोजक यांची असते तसेच सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या चाहते व भक्तांना सांगायला पाहिजे होते की तुम्ही या कार्यक्रमासाठी येऊ नका तुम्ही हा कार्यक्रम टीव्हीवर दूरदर्शन वर लाईव्ह बघा तसेही त्यांनी हे केले नाही त्यामुळे प्रेक्षक व नागरिक यांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यातील कित्येक रुग्णालयात आजारी आहेत व कित्येक व्यक्ती मृत्यू पावलेले आहेत या सर्व घटनेचे दोषी संयोजक आयोजक व व्यासपीठावर असणारे प्रत्येक व्यक्ती यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार राष्ट्रपती भवनात साध्या पध्दतीने दिला जातो मग महाराष्ट्र भूषण हाही पुरस्कार राजभवनात दिला जाऊ शकला असता!!!कायदा हा सर्वांसाठी समान आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा सद्गुरु आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला त्या दिवशी व त्यावेळी जितके नागरिक प्रेक्षक म्हणून होते त्या प्रेक्षकांना उष्माघाताने शारीरिक व मानसिक त्रास झाला व त्यातील कित्येक व्यक्ती उष्मघाताने गंभीर आजारी आहेत व पंधरा ते वीस व्यक्ती मृत्यू पावले आहेत व अजूनही ही परिस्थिती वाढत जात आहे या सर्व घटना घडल्या त्या जाणून बुजून संयोजक आयोजक व मॅनेजमेंट विभाग यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संयोजक आयोजक व मॅनेजमेंट विभाग व व्यासपीठावर असणारे प्रत्येक व्यक्ती जबाबदार आहे म्हणून या सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.लवकरात लवकर दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रतिभा शेलार यांनी मुंबई जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
