लोकराजाला वंदन! रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रकडून राजर्षी शाहू महाराजांना जयंतीदिनी अभिवादन
छत्रपती संभाजीनगर (२६ जून प्रतिनिधी):-
बहुजन प्रतिपालक, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने आज त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. येथील मिलकॉर्नर भागातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्रचे पक्षप्रमुख राजुभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. शाहू महाराजांच्या समतावादी विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आला.
या अभिवादन कार्यक्रमाला पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अविनाश थिट्टे, मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख दिनेश गवळे, अहिल्यानगर जिल्हाप्रमुख महेश अंगारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच शहराध्यक्ष रणजीत मनोरे, जिल्हा सचिव रवि मोरे, कामगार आघाडी शहराध्यक्ष संतोष उणवणे, महिला शहराध्यक्ष मानसीताई म्हस्के, प्रकाश घोरपडे आणि अमित मोरे सतीश प्रधान यांच्यासह उपस्थित होते.
