राहता प्रतिनिधी(दि.२० एप्रिल):-राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील 17 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला कॉलेजला जाताना व येताना तरुण त्रास देत असल्याने या तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. लोणी पोलिसांनी तीन आरोपींवर याबाबत गुन्हे दाखल केले असून दोघांना अटक केली आहे.पिंपरी निर्मळ येथील 17 वर्षांची तरुणी बाभळेश्वर येथे कॉलेजला जात असताना बाभळेश्वर येथील दोघे व राहुरीतील एक अशा तिघांनी तिला वारंवार त्रास दिल्यामुळे या तरुणीने पिंपरी निर्मळ येथील पंढरीनाथ सारंगधर पवार यांच्या शेततळ्यामध्ये आत्महत्या केली.एसडीपीओ संदीप मिटके,सपोनी/युवराज आठरे,पोसई/योगेश शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.मुलीच्या चुलत्यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०५, ३५४(डी), ३४ बालकांचे लैगिक अत्याचारापासूनचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम १२ प्रमाणे तिघांवर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यापैकी आरोपी मयुर दिलीप पवार रा.राहुरी फॅक्टरी, किरण मच्छिंद्र गुंजाळ रा.बाभळेश्वर या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.तर साहील कैलास राजळे रा.बाभळेश्वर हा आरोपी पसार आहे.लोणी पोलीस स्टेशनचे सपोनी/युवराज आठरे याबाबत अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे मुली व पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
