सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
अहिल्यानगर प्रतिनिधी (विजय भंडारी):-“कुटुंब आणि संस्कृतीची सुदृढता हीच राष्ट्राची खरी ताकद आहे. चिंतनशील,सुसंस्कृत आणि युगानुकूल मातृत्वच आजच्या काळात सुसंस्कारी व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती करू शकते,” असा ठाम सूर विश्वमांगल्य सभेच्या बैठकीत उमटला.पाईपलाईन रोड येथील श्रमिकनगर येथे रविवार,दि.२० सप्टेंबर २०२६ रोजी विश्वमांगल्य सभेच्या विशेष बैठकीचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले होते.या बैठकीत संस्थेचे मूळ उद्देश,कार्यपद्धती आणि भविष्यातील दिशा यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.बदलत्या काळानुसार प्रत्येक परिवारात कौटुंबिक संघटन टिकवून ठेवणे, आपल्या समृद्ध संस्कृतीचे जतन करणे आणि राष्ट्रधर्म जागृत ठेवण्यासाठी मातृशक्तीने एकत्र येणे काळाची गरज असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले.या बैठकीचे यशस्वी संयोजन विश्वमांगल्य सभेच्या संयोजिका रजनी मनोज भंडारी यांनी केले.
या कार्यक्रमास मातृशक्तीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या वेळी निर्मला सग्गम,उज्वला आकूबत्तीन,रजिता नागवेल्ली,अनिता नुती,गीता गोसके, कल्पना चिट्टा,स्वरूपा आकूबत्तीन,वैशाली गुडूर, अनिता बिज्जा,आरती बिज्जा,मोनिका येमूल,जयश्री येनगुल, अमृता सिद्दम,रुपाली येमूल, निलिमा येमूल,मनीषा कोमटी,रेणुका आकूबत्तीन,जयश्री रच्चा,बोगा,सुरेखा कोडम, गीता अनमल आदी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांनी आपल्या परिवारात संस्कार आणि संस्कृतीची ज्योत तेवत ठेवत राष्ट्रकार्यात सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प केला.
