‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पांढरीपूल परिसरातील ‘हॉटेल गुडलक’ येथे मॅनेजर म्हणून काम पाहण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणावर काहीही कारण नसताना जीवघेणा हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत दोन संशयित मारेकऱ्यांना शिताफीने अटक केली आहे.फिर्यादी विशाल महादेव उरुडे (वय २६,धंदा- ड्रायव्हर,रा.नेप्ती नाका, दातरंगे मळा,नालेगाव,ता.जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,ऋषीकेश गहिनीनाथ आव्हाड हा पांढरीपूल येथे गणपती विसर्जनानंतर ‘हॉटेल गुडलक’ सुरू करणार होता.त्या हॉटेलची पूर्वतयारी करण्यासाठी आणि नंतर मॅनेजर म्हणून कामासाठी फिर्यादीचा भाऊ सागर महादेव उरुडे (वय २८,रा.नेप्ती नाका, नालेगाव) याला सोबत नेण्यात आले होते.दरम्यान,आरोपी सागर आव्हाड आणि शेखर खंडागळे यांनी कसलेही कारण नसताना सागर उरुडे यास जबर मारहाण केली.या गंभीर मारहाणीत सागर उरुडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला.याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गु.र.नं ७६५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि.हेमंत थोरात यांनी तात्काळ तपास पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.
तपास पथकाने तातडीने धावपळ करत आरोपींचा माग काढला आणि सागर भारत आव्हाड (वय २२ वर्षे, रा. पारेगाव,ता. जि. अहिल्यानगर),शेखर राजेंद्र खंडागळे (वय २३ वर्षे, रा. पांढरीपूल गुंजाळे,ता. नेवासा,जि.अहिल्यानगर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले:गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करत आहेत.सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग शशिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.हेमंत थोरात,पोसई.अमोल गर्जे, पोहेकॉ.बापुसाहेब फोलाणे, शैलेश रोहोकले,देविदास खेडकर,राजु सुद्रीक,दिपक फुंदे,नवनाथ दहिफळे,किशोर जाधव,संपत खेडकर,प्रशांत धुमाळ,राहुल गुंडु व अरुण सांगळे यांनी केली आहे.
