अहमदनगर प्रतिनिधी(दि.२० एप्रिल):-शहरातील नीलक्रांती चौकात अल्पवयीन मुलास तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करत असताना तोफखाना पोलिसांनी पकडले.याबाबत माहिती अशी की दि.१९ एप्रिल रोजी रात्रीचे ०१.१५ वाजे सुमारास शब-ए-कद्र बंदोबस्तावरील असलेल्या तोफखाना पोलीसांना माहिती मिळाली कि निलक्रांती चौक येथे एक अल्पवयीन मुलगा तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करत आहे मिळालेल्या माहिती नुसार तोफखाना पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याचे विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/मधुकर साळवे,सपोनि/श्री नितीन रणदिवे,पोसई/समाधान सोळंके,पोहेकॉ/ दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे, पोना/सुरज वाबळे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/चेतन मोहीते पोकॉ/सतीष त्रिभुवन,पोकॉ/सचीन जगताप,पोकॉ/गौतम सातपुते यांनी केली आहे.
