अहमदनगर जिल्हा रोलबॉल व ऐरोस्केटोबॉल संघटनेच्या वतीने स्केटिंग खेळाडूंसाठी वाडियापार्क मध्ये मोफत प्रशिक्षण शिबिर
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मे):-अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटना व अहमदनगर जिल्हा ऐरोस्केटोबॉल संघटना यांच्या सयुंक्त विद्यमाने स्केटिंग खेळाडूंसाठी 10 मे ते 17 मे 2023 दरम्यान वाडिया पार्क क्रीड़ा संकुल येथे सकाळी 7:00 ते 8:30 वाजता मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या सचिव सौ. सविता पाटोळे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.सदर प्रशिक्षण शिबीर हे वय वर्ष 10 ते 17 वर्ष मुले व मुलींसाठी आयोजित केले असून या प्रशिक्षण शिबिरासाठी स्केटिंग खेळाडू हा क्वाड्स किंवा इनलाईन प्रकाराचा असावा अशी माहिती ऐरोस्केटोबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.सचिन गायकवाड यांनी दिली.खेळाडूना या उन्हाळी सुट्टीत नवीन खेळाची ओळख होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने या मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे एन.एस.पी.फाउंडेशनच्या सौ.नलिनी सुंदर पाटोळे यांनी सागितले.सदर प्रशिक्षण शिबिराचा शहरातील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्याव्या असे आवाहन प्रशिक्षक श्री.प्रदीप पाटोळे यांनी केले.
अधिक माहितीसाठी संपर्क 8275191771/ 8805388989.