Maharashtra247

जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेली सुगंधीत तंबाखू, गुटखा,पानमसाला विक्रेत्यांवर एलसीबीची धडक कारवाई;दोन लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ मे):-भिंगार व कोपरगांव तालुका येथील वेगवेगळ्या दोन ठिकाणी महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यास प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्रेत्या विरुध्द कारवाई करुन 2,63,203/- रु.किंचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, पोना/सचिन आडबल,संतोष लोढे,संदीप चव्हाण,पोकॉ/शिवाजी ढाकणे,आकाश काळे,रोहित मिसाळ,सागर ससाणे,रणजीत जाधव व मपोकॉ/ज्योती शिंदे अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाला विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकाने भिंगार व कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन हद्यीत कारवाई करुन अवैधरित्या गुटखा व पानमसाला विक्री करणारे 02 ठिकाणी छापे टाकुन एकुण 2,63,203/- (दोन लाख त्रेसष्ट हजार दोनशे तीन) रुपये किंमतीचा विमल,रजनीगंधा, व्हि-1 टोबॅको,चैनी,मिराज, रॉयल 717 तंबाखु,गुटखा, पानमसाला व एक ऍ़क्टीव्हा असा मुद्देमाल जप्त करुन खालील प्रमाणे 04 आरोपीं विरुध्द भिंगार कॅम्प व कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे भादवि कलमान्वये खालील प्रमाणे एकुण-02 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम आरोपीचे नाव व पत्ता जप्त मुद्देमाल

1)भिंगार कॅम्प गु.र.नं. 241/23 भादविक 328, 188, 272, 273

1) आयुब शेरु शेख वय 32, रा.अलमगिर,भिंगार, ता. नगर 1,06,083/- रुपये किंमतीचा विमल,रजनीगंधा, व्हि-1 टोबॅको, चैनी,मिराज, रॉयल 717 तंबाखु,गुटखा व पानमसाला

2)कोपरगांव शहर गु.र.नं. 200/23 भादविक 328, 188, 272, 273, 34 1) शुभम राजेंद्र घोडेराव वय 22

2)अभिषेक उदयनारायण सिंग वय 21

दोन्ही रा.टाकळीनाका,ता. कोपरगांव

3)वसीम पटेल रा. संभाजीनगर,1,57,120/- रुपये किंमतीचा विमल, रजनीगंधा,व्हि-1 टोबॅको, चैनी,मिराज,रॉयल 717 तंबाखु,गुटखा,पानमसाला व एक ऍ़क्टीव्हा एकुण 04 आरोपी 2,63,203/-रुपये किंमतीचा विमल,रजनीगंधा,व्हि-1 टोबॅको,चैनी,मिराज,रॉयल 717 तंबाखु, गुटखा,पानमसाला व एक ऍ़क्टीव्हा सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर,श्रीमती.स्वाती भोर मॅडम,अपर पोलीस अधिक्षक साहेब,श्रीरामपूर,श्री.संदीप मिटके उविपोअ,श्रीरामपूर विभाग व श्री.आण्णासाहेब जाधव उविपोअ,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page