भोई समाज महिला क्रांती दलाच्या प्रदेश सरचिटणीस पदी अनिताताई नेमाडे यांची निवड
प्रतिनिधी(दि.२ मे):-सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई नेमाडे यांची भोई समाज महिला क्रांती दलाच्या प्रदेश सरचिटणीस पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. अनिताताई नेमाडे यांचे समाजकार्य यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.लोकांच्या हाकेला धावून जाणाऱ्या ताई अशी त्यांची यवतमाळ जिल्ह्यात ओळख आहे.त्याचीच पावती म्हणून त्यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे,अर्जुन भोई प्रदेश महासचिव,राहुल हरसुले प्रभारी प्रदेशाध्यक्ष तसेच महिला प्रदेशाध्यक्ष अलकाताई घाटे यांच्या सहीनिशी सौ.अनिताताई सुरेशराव नेमाडे यांना हे नियुक्तीपत्र दि.१ मे रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून देण्यात आले आहे.