दोन बुरखाधारी महिलांनी पावणेदोन तोळे सोने लांबविले
श्रीरामपूर प्रतिनिधी(दि.७ मे):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातील एका सराफाच्या दुकानात सोने खरेदीच्या बहाण्याने गेलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी हात चलाखी दाखवत पावणेदोन तोळे वजनाचे सोन्याचे शॉट गंठण चोरून नेले.शहरातील मे.पोपट उत्तम चापानेरकर या सराफ दुकानात अगोदर एक पुरुष व दोन महिला ग्राहक सोने खरेदी करत असताना त्यांच्या शेजारी दोन बुरखा घातलेल्या महिला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याच शेजारीच येवून थांबल्या.सोने घेवून बिल करण्यासाठी थांबलेल्या ग्राहकाच्या शेजारी या महिला सोने पाहण्याचे नाटक करत हातचलाखी करून काऊंटरवर असलेले (15.219) ग्रॅम वजनाचे शॉट गंठण लांबवत हळूहळू तेथून त्यांनी पोबारा केला.सोने चोरी झाल्याचे समजताच शोधाशोध केली.त्यानंतर याबाबतची माहिती दुकान मालकाने पोलिसांना सांगितली.त्यानंतर त्यांनी सीसी टीव्ही फुटेज तपासले असता दोन बुरखाधारी महिलांनी सोने लांबविल्याचे दिसून आले.पुढील तपास पोलीस करीत आहेत.