Maharashtra247

रात्रीच्या वेळी धारधार शस्त्रांचा धाक दाखवुन ट्रकचालकास लुटणाऱ्या दोघांना घातक शस्त्रासह नगर तालुका पोलिसांनी एका तासातच केली जेरबंद

 

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.७ मे):-रात्रीच्या वेळी धारधार शस्त्रांचा धाक दाखवुन ट्रकचालकास लुटणारी टोळी घातक शस्त्रासह,व गुन्ह्यातील मुद्देमालसह एक तासात जेरबंद करण्यात नगर तालुका पोलीसांना यश आले आहे.दि.७ मे रोजी नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीत वाळुंज बायपास ते आरणगाव बायपास दरम्यान आरणगाव बायपासचे पुढे ब्रीजजवळुन ट्रकचालक जात असताना रात्री 12/30 वा.च्या सुमा. सदर ट्रकचालकाचे ट्रकसमोर सदर गुन्ह्यातील आरोपीतांनी त्यांचे ताब्यातील एक काळ्या रंगाची मोपेड मोटारसायकलवर तीन इसमांनी येवुन त्यांनी त्यांची मोटारसायकल सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांचे ट्रकला आडवी लावली.व गाडीवरुन उतरुन खाली उतरले.त्यापैकी एका आरोपीताचे हातात लोखंडी धारदार कोयता होता.त्याने तो कोयता फिर्यादी यांचे मानेला लावला व दुस-या आरोपीताने त्याचे हातातील एक धारदार कोयता हा फिर्यादी यांचे मानेस लावला व फिर्यादी यांना धमकावले.व सदर आरोपीताने फिर्यादी यांचे शर्टचे वरील खिशातील दोन हजार रुपये काढुन घेतले. त्यावेळी फिर्यादी यांच्या पाठीमागील ट्रकवरील दुसरा चालक राजा याने मोठमोठ्याने आरडाओरडा केला.तेव्हा तेथे लोक जमा झाले.व सदर घटनेबाबत पोलीस स्टेशनला फोन आल्याने सदर ठिकाणी रात्रगस्त करिता असलेले अंमलदार गेले.व सदर तीन आरोपीतांपैकी दोन आरोपीतांना तेथे जमा झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी लुटमार करताना जागीच पकडले.व सदर आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) साई प्रदिप ठोसर वय-19 वर्ष रा.अमित नगर केडगाव ता. जि.अहमदनगर 2 ) शिवप्रसाद नारायन शिंदे वय-22 रा.एकता कॉलनी केडगाव ता. जि. अहमदनगर असे सांगीतले.व त्यातील एक इसम अंधाराचा फायदा घेवुन त्याच्याकडिल गाडीवर बसुन पळुन गेला.सदर पळुन गेलेल्या इसमाचे वरील पकडलेल्या दोन आरोपीतांना नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव-3)अक्षय साबळे (पुर्ण नाव माहीत नाही) रा. रामवाडी ता.जि.अहमदनगर असे असल्याचे सांगितले.व सदर इसमांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात 20,000 रु. किंचे दोन मोबाईल,500 रुपये किंमतीची एक लोखंडी कत्ती,व 1800 रुपये रोख रक्कम असा एकुण 22.300/- रु.किं.चा मुद्देमाल पंचांसमक्ष जागीच जप्त करण्यात आला.व सदर घटनेच्या अनुशंगाने नगर तालुका पोलीस स्टेशनला 1393/2023भा.द.वि. कलम 392,34 आर्म अॅक्ट 4/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर अहमदनगर जिल्ह्यात खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे- शिवप्रसाद नारायन शिंदे,वय 22 वर्षे,रा.एकता कॉलनी केडगाव ता.जि.अहमदनगर

याचेवर दाखल असलेले गुन्हे अ.क्र पोलीस स्टेशन

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन

गु.र.नं व कलम

गुरनं-2264/2021 भा.द.वि कलम 392,336,337,427,34 भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुरनं-178 /2020 मु.पो.का. कलम-37/1/3,135 प्रमाणे.

*आरोपी नामे-साई प्रदिप ठोसर,वय-19 वर्षे,रा.अमित नगर केडगाव ता.जि. अहमदनगर याचेवर दाखल असलेले गुन्हे अ.क्र पोलीस स्टेशन 1)गु.र.नं व कलम

गुरनं-1083/2023 मु.पो. का.कलम 122 (ड)

कोतवाली पोलीस स्टेशन

सदर गुन्ह्यातील आरोपी नामे- 1)साई प्रदिप ठोसर वय-19 वर्ष रा.अमित नगर केडगाव ता. जि. अहमदनगर 2) शिवप्रसाद नारायन शिंदे वय-22 रा.एकता कॉलनी केडगाव ता.जि.अहमदनगर यांना आज रोजी नमुद गुन्ह्यात अटक करुन मा. कोर्टात हजर केले असता मा. कोर्टाने सदर आरोपीतांना कोर्टाने दि-08/05/2023 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड सुनावली.सदर आरोपीतांकडे तपासादरम्यान त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी कबुली दिली की,त्यांनी व त्यांचा मित्र अक्षय साबळे यांनी महिन्यापुर्वी नगर पुणे रोडवर एका पिकअप चालकास लुटले होते.व तीन दिवसापुर्वी बुरुडगाव गावचे शिवारात एका इसमास मारहाण केली होती.नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत नगर-पुणे हायवे रोडवर चास गावचे शिवारात व बुरुडगाव गावचे शिवारात खालील गुन्हे केल्याची कबुली दिली.

अ.क्र पोलीस स्टेशन 1 नगर तालुका पोलीस स्टेशन 2 गु.र.नं व कलम

गुरनं-818/2022 भा.द.वि कलम 392,504,506,34

नगर तालुका पोलीस स्टेशन गुरनं-384/2023 भा.द.वि कलम 326,452,323

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक राकेश ओला अहमदनगर,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अजित पाटील . यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पो. निरीक्षक शिशीरकुमार देशमुख,पो.उपनिरीक्षक युवराज चव्हाण,पोना/बाळु कदम,पोकॉ/कमलेश पाथरुट, पोकॉ/विक्रांत भालसिंग, पोकॉ/संभाजी बोराडे,पोकॉ/संदीप जाधव,चासफो / दिनकर घोरपडे,चापोकॉ/विकास शिंदे यांच्या पथकाने केलेली आहे.

You cannot copy content of this page