Maharashtra247

कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या एमआयडीसी पोलीसांनी आवळल्या मुसक्या 

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ जून):-एमआयडीसी परीसरात कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणारा सराईत आरोपी एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद केला आहे. बातमीतील माहिती अशी की,दि.२९ मे रोजी फिर्यादी नामे नितीन सुधाकर गायकवाड वय ३४ वर्ष धंदा- पान स्टॉल चेतना कॉलनी नवनागापुर यांनी फिर्याद दिली की,दिन २९ मे रोजी साई पान स्टॉल चेतना कॉलनी अहमदनगर मनमाड रोडवर पान विक्री करत असतांना दोन आरोपी यांनी हातात कोयता व गुप्ती घेवुन त्याचा धाक दाखवून फिर्यादीचे पान स्टॉल गल्यातील दोन हजार रुपये बळजबरीने काढुन चोरुन नेले आहे.वैगेरे मचकुराचे फिर्यादीवरुन एमआयडीसी पोस्टे गुन्हा रजि.नंबर ४७७ / २०२३ भादवि ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्हयाचा समांतर तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नामे १)शुभम उर्फ छब्या रविंद्र गायकवाड वय २० वर्ष रा फोर्जिंग कॉलनी वडगाव गुप्ता शिवार ता.जि.अहमदनगर २)विश्वास गायकवाड रा.एमआयडीसी अहमदनगर यांनी केला आहे. त्यानुसार सपोनि/राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी नामे शुभम उर्फ छब्या रविंद्र गायकवाड वय-२० वर्ष रा फोर्जिंग कॉलनी वडगाव गुप्ता शिवार ता.जि.अहमदनगर यांना शिताफीने पकडले. त्याचेकडे विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याचेकडुन गुन्हयातील २,०००/-रु रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.आरोपी नामे शुभम उर्फ छव्या रविंद्र गायकवाड वय २० वर्ष रा फोर्जिंग कॉलनी वडगाव गुप्ता शिवार ता. जि. अहमदनगर याचेवर खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ४७७ /२०२३ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे.

२) एमआयडीसी पोलीस स्टेशन गु रजि नंबर ४८८ / २०२३ आर्म अॅक्ट ४ / २५ प्रमाणे.

सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,श्री.संपत भोसले साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/ राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन,पोसई/योगेश चाहेर,पोसई/राजेंद्र गायकवाड,पोकॉ/सचिन हरदास,पोकॉ/किशोर जाधव पोकॉ/सुरज देशमुख यांनी केली आहे

You cannot copy content of this page