स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई सावेडी परिसरातील भिस्तबाग महल येथे दरोड्याच्या तयारीत असलेली औरंगाबाद येथील टोळी जेरबंद;धारदार शस्त्रांसह १३ मोबाईल,तलवार लाकडी दांडके व स्विफ्ट कार जप्त
अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ जुन):-सावेडी तपोवन रोड येथील भिस्तबाग महल परिसरात दरोड्याचे तयारीत असलेली औरंगाबाद येथील तीन सराईत आरोपींना ४,७८,२००/- रुपये किंमतीची स्विफ्ट कार,तेरा मोबाईल फोन,लोखंडी तलवार व लाकडी दाडंके अशा साधनासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवून त्यांचे विरुद्ध कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव,पोहेकॉ/विजय वेठेकर,संदीप पवार,विजय ठोंबरे,विशाल गवांदे,संतोष लोढे,संदीप दरदंले,फुरकान शेख,पोकॉ/आकाश काळे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथक अहमदनगर शहर व उपनगर परिसरात फिरून फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की,आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,५ ते ६ इसम लाल रंगाचे कारमध्ये दरोडा टाकण्याचे पुर्व तयारीने तपोवन रोड भिस्तबाग महला जवळ अंधारामध्ये दबा धरुन बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने तपोवन रोड भिस्तबाग महला जवळ जावुन खात्री केली असता थोडया अंतरावर अंधारामध्ये एक कार व कार जवळ दोन इसम उभे असलेले दिसले पथक कार जवळ जावुन संशयीत इसमांना पकडण्याचे तयारीत असताना कार जवळ उभे असलेले दोन इसमांना पथकाची चाहुल लागताच ते पळुन गेले व कारचे आत बसलेल्या इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १)संतोष अशोक कांबळे वय २४,रा.साठेनगर, वांळुज पंढरपुर,ता.गंगापुर, जिल्हा संभाजीनगर २)रविंद्र बापु चव्हाण वय २३,रा. कमलापुर रोड,वांळुज पंढरपुर,ता.गंगापुर,जिल्हा संभाजीनगर व ३)रवि आबासाहेब बोरुडे वय २३, रा.समता कॉलनी वांळुज पंढरपुर,ता.गंगापुर,जिल्हा संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.संशयीत इसमांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक तलवार,एक लाकडी दांडके, एक लाल रंगाची स्विफ्ट कार व तेरा मोबाईल फोन असा एकुण ४,७८,२००/- रु. किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याबाबत विचारपुस करता त्यांनी कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने आल्याची कबुली दिल्याने आरोपींना सदर मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांचेकडे पळुन गेलेल्या इसमांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे व पत्ता ४) ओंकार रोडे (फरार) ५) अकबर नासिर शेख( फरार ) दोन्ही रा.वांळुज पंढरपुर,ता.गंगापुर,जिल्हा संभाजीनगर असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ८१०/२३ भादविक ३९९, ४०२ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दिनांक १/६/२३ रोजी दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अनिल कातकडे,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.