अहमदनगर प्रतिनिधी (दि.१ जून):-कर्जत तालुक्यातील बेनवाडी येथे घरासमोर लावलेल्या हुंडाई क्रेटा गाडीची काच फोडुन गाडीत ठेवलेली १३,००,०००/- (तेरा लाख) रोख रक्कम चोरी करणारी आतंरराज्य टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
बातमीची हकिगत अशी की घटनेतील फिर्यादी श्री. अतुल नवनाथ गदादे(वय ३३, रा. बेनवडी,ता.कर्जत) यांनी दिनांक २८/०३/२३ रोजी त्यांचे घरा समोर लावलेली हुंडाई क्रेटा गाडी क्र. एमएच / ४२/बीबी/३२५१ यामध्ये गाडीचे पाठीमागील सिटवर लाल रंगाचे प्लॅस्टीकचे बॅगमध्ये ठेवली होती. १३,००,०००/- (तेरा लाख) रुपये रोख रक्कम गाडीचे मागील दरवाजाची काच फोडुन कोणीतरी अनोळखी आरोपींनी चोरुन नेली होती.या घटेने बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन कर्जत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१७७/२०२३ भादविक ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.चोरीची घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी पोनि.श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशा प्रमाणे पोनि.श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/सुरेश माळी, देवेंद्र शेलार,पोना/रविंद्र कर्डीले,पोकॉ/सागर ससाणे,रोहित येमुल,भाऊसाहेब काळे,मेघराज कोल्हे व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन सदर चोरीचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्याने पथक कर्जत परिसरात फिरुन संशयीत आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,सदर गुन्हा आरोपी नामे गोपी शिंडे (रा.घन्तावारपल्ली,ता.बेगी पल्ली,जिल्हा चिकबलपुर,राज्य कर्नाटक) याने केला असुन तो सध्या त्याचे गांवी घन्तावारपल्ली, राज्य कर्नाटक येथे असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश देवुन पथकास लागलीच रवाना केले.पथक बातमीतील नमुद ठिकाणी घन्तावारपल्ली,राज्य कर्नाटक येथे जावुन आरोपीचे ठावठिकाणाबाबत माहिती घेतली असता संशयीत इसम हा टोमॅटो मार्केट येथे असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १) गोविंद ऊर्फ गोपी रमेश शिंडे वय २५, रा.घन्तावारपल्ली, ता.बेगीपल्ली, जिल्हा चिकबलपुर,राज्य कर्नाटक असे सांगितले.त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे इतर साथीदार नामे अंजी कट्टा,रघु अंजी कट्टा दोन्ही रा.घन्तावारपल्ली,ता.बेगीपल्ली,जिल्हा चिकबलपुर,राज्य कर्नाटक, देवराज कृष्णाअप्पा शिंडे, आलम चेकपोस्ट,गुलबर्गा,राज्य कर्नाटक,कुमार अंजी बलोत रा.कम्मापाडु,ता. माचार्ला,जिल्हा गुंटूर,राज्य आंध्रप्रदेश व मल्लम्मा ऊर्फ पद्मा अंजी कट्टा रा.घन्तावारपल्ली,ता.बेगेपल्ली, जिल्हा चिकबलपुर,राज्य कर्नाटक यांनी मिळुन केला असल्याची कबुली दिली.ताब्यातील आरोपीकडे त्यांचे इतर साथीदारांचे वास्तव्याबाबत विचारपुस करता त्याने त्याचे इतर साथीदार सध्या भिगवन,ता. इंदापुर,जिल्हा पुणे येथे पालाच्या झोपडीत राहत असल्याचे सांगितले.पथकाने सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता गोपनिय माहिती मिळाली की,अंजीकट्टा व त्याचे इतर साथीदार हे कर्जत बस स्टॅण्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पथक कर्जत बसस्टॅण्ड परिसरात सापळा लावुन थांबलेले असताना एका चहाचे टपरी जवळ आरोपी उभे असलेले दिसले.पथक त्यांना पकडण्याचे तयारीत असताना आरोपींना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते गाडीवर बसुन पळुन जावु लागले.पथकाने पळत जावुन पाठीमागे बसलेल्या आरोपी पकडले व दोन इसम काळे रंगाचे युनिकॉन मोटार सायकलवर बसुन पळुन गेले.ताब्यात घेतलेल्यास इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्यांचे नाव २)अंजी अर्जुन बलोत ऊर्फ कट्टा वय ४५,रा.घन्तावारपल्ली,ता. बेगेपल्ली,जिल्हा चिकबलपुर,राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले.त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने दोन्ही आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे पळून गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे साहेब अपर पोलीस अधिक्षक,श्री. विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
