श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१ जून):-अमली पदार्थ गांज्या कब्जात बाळगुन त्याची वाहतुक करताना एका आरोपीला पकडुन त्याच्या विरुदध कारवाई करुन ६, २४,०९०/-रु किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात बेलवंडी पोलीसांना यश आले आहे.दि.३० मे रोजी बेलवंडी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,बेलवंडी पोलीस स्टेशन हददीत ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर अवैध दारु व बनावट हत्याराची चोरटी वाहतुक होणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पो.नि.संजय ठेंगे यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी पंचासह जावुन कायदेशिर कारवाई करणेबाबत आदेश देवुन त्यांना ढवळगाव ते पिंपळगाव पिसा रोडवर पिंपळगाव पिसा आठाचा मळा येथे रवाना केले असता पोलीस अधिकारी व कर्मचारी हे प्रत्येक संशयीत वाहनांना थांबवून त्याची तपासणी करत असताना दि. ३०.०५.२०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी क्र MH ०१ AL १२३४ अशी आली असता नमुद गाडीस थांबवुन त्यात बसलेल्या इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव बबन संभाजी पंदरकर (रा.पिंपळगाव पिसा ता. श्रीगोंदा)असे सांगितलेने त्याचे गाडीची झडती घेतली असता सदर गाडीमध्ये मागील सिटच्या खाली गांजाचे खाकी रंगाचे सात पुडे ७ किलो ४१८ ग्रॅम वजनाचे ७४,०००/- रु किंमतीचे तसेच ५,५०,०००/- रु किंमतीची एक सिल्वर रंगाची पजेरो गाडी MH ०१ AL १२३४ असा एकुण ६,२४,०९० /- रु किंमतीचा मुददेमाल मिळुन आला.बबन संभाजी पंदरकर याचे विरुदध एन.डी.पी.एस.अॅक्ट १९८५ चे कलम-८ (C), २० (b) (ii) B प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास पो.स.ई.गाजरे हे करत आहेत.सदरची कारवाई ही श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक,श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत,यांचे मागदर्शनाखाली पो.नि.श्री.संजय ठेंगे, पो.स.ई.गाजरे, स.फौ.आर.टी.शिंदे,पो.हे.कॉ. हसन शेख,पो.हे. कॉ. अजिनाथ खेडकर, चा.पो.हे.कॉ.भाऊ शिंदे, पो.कॉ.विनोद पवार,पो.कॉ. संदिप दिवटे,पो.कॉ,कैलास शिपनकर,पो.कॉ.सतिष शिंदे, पो.कॉ.भांडवलकर,म.पो.ना.सुरेखा वलवे,म.पो.कॉ. घोगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कर्जत येथील पो.हे.कॉ/प्रकाश शिंदे, पो.कॉ.इरुफान शेख यांनी केली आहे.
Trending Topics:
Trending
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
- गर्दीत प्राण वाचवणार प्रशिक्षित हात..! जिल्हा रुग्णालयातर्फे गणेश मंडळांना आता मिळणार CPR धडे..
