अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मे):-एमआयडीसी येथे मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला ८५,०००/- रु.किमतीचे चार मोबाईलसह जेरबंद करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.घटनेची माहिती अशी की,दि.२८ मे रोजी रोजी यातील फिर्यादी नामे अभिषेक सतिष झुगे(वय १७ वर्षे रा.पढेगाव ता.श्रीरामपुर जि.अहमदनगर ह.रा. शिवाजीनगर,नवनागापुर ता. जि.अहमदनगर) यांनी फिर्याद दिली की दि.२७ मे रोजी रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र हे त्यांचे घराचे टेरेसवर झोपलेले असतांना उशाशी ठेवलेले ६५,०००/- रु.किमतीचे दोन मोबाईल रात्री ०१.०० वा ते ०४.०० वा चे सुमारास अज्ञात चोरटयाने चोरुन नेले आहे. त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरनं. ४७२/ २०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्हयाचा तपास करत असतांना सपोनि/राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की,सदरचा गुन्हा हा आरोपी नामे बाळु शंकर काळे (वय १८ वर्षे २ महिने रा. चेतना कॉलनी,खंडोबा मंदिराचे पाठीमागे,ता.जि. अहमदनगर) याने केला आहे अशी माहिती मिळाल्याने सदर आरोपीला पकडणे करीता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पथक तयार करण्यात आले.एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी याला ताब्यात घेऊन त्याचेकडे विचारपुस करता त्यानी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केला.त्याचे कडुन ८५,०००/- रु किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे.सदरची कामगिरी श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक, श्री.संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोस्टे,पोसई/राजेंद्र गायकवाड,पोसई/चांगदेव हंडाळ,पोना/मच्छिंद्र पांढरकर,पोना/चांगदेव आंधळे,पोना/संदिप आव्हाड, पोकी/सचिन हरदास यांनी केलेली आहे.
