अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मे):-जामखेड येथुन महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व सुगंधी तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन वाहतुक करणारे तीन आरोपी विरुध्द कारवाई करुन १४,३४,०००/- रु.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थागुशा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक ३०/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी,संदीप पवार,पोना/सचिन आडबल,पोकॉ/रणजीत जाधव,शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ व प्रशांत राठोड अशांना बोलावुन जामखेड तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले.पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,इसम नामे विनोद तोंडे (रा.बीड रोड,ता.जामखेड) याने महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा,पानमसाला व तंबाखु विक्री करण्याचे उद्देशाने मालवाहु टेम्पोमधुन मागविली असुन ते घेण्यासाठी जामखेड तालुक्यातील लोहारदेवी मंदीरा जवळील मोकळे मैदानात येणार आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन पंचाना सोबत घेवुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले.पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी लोहारदेवी मंदीरा जवळील मोकळे मैदाना जवळ जावुन खात्री केली असता एका अशोक लेलंड छोट्या टेम्पोमधुन तीन इसम काही गोण्या या टोम्पो जवळच उभ्या असलेल्या पांढरे रंगाचे स्कॉर्पीओ गाडीमध्ये भरताना दिसले पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकुन सदर इसमांना जागीच पकडुन पोलीस पथकाची ओळख सांगुन दोन्ही वाहनांची पंचा समक्ष झडती घेता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला हिरा गुटखा,पानमसाला व रॉयल तंबाखु असल्याची खात्री झाल्याने तिनही आरोपींना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गांव विचारले असता टेम्पो चालकाने त्याचे नाव १)राजु विठ्ठल शिंदे वय ३०, रा.चौसळा,जिल्हा बीड व स्कॉर्पीओ जवळील इसमांनी त्यांची नावे २)मोहित सुभाष मिसाळ वय १९, ३)योगेश सुखदेव खाडे,वय १९,दोन्ही रा.आनंदवाडी,ता.जामखेड असे सांगितले.टेम्पो चालक आरोपी नामे राजु शिंदे यास टेम्पो मधील मुद्देमालाबाबत विचारपुस करता त्याने सदर माल हा कर्नाटक येथील शेट्टी याचेकडुन ४६ गोण्या हिरा गुटखा,पानमसाला विकत आणुन त्यापैकी ३० गोण्या या मंझीरी,ता.पाटोदा, जिल्हा बीड येथील गिते पुर्ण नाव माहित नाही यांना दिल्या व १६ गोण्या या ४) विनोद छबु तोंडे,रा.बीड रोड,ता. जामखेड (फरार ) यांनी विक्री करण्याचे उद्देशाने मागविला होता असे सांगितले.व आरोपी नामे मोहित मिसाळ याचेकडे विचारपुस करता त्याने सदर हिरा गुटखा,पानमसाला व तंबाखुच्या १६ गोण्या विनोद तोंडे याने स्कॉर्पीओ मध्ये भरुन घेवुन येण्यास सांगितले अशी कबुली दिली.वर नमुद तीन आरोपींचे ताव्यातुन १९,९२,०००/- रु. किंमतीचा हिरा गुटखा, पानमसाला,४२,०००/- रु. किंमतीची रॉयल तंबाखु, ६,००,०००/- रु.किंमतीची अशोक लेलंड कंपनीचा मालवाहु टेम्पो व ६,००,०००/- रु.किंमतीची स्कॉपीओ गाडी असा एकुण १४,३४,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल बेकायदेशिररित्या कब्जात बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने वाहतुक करताना मिळुन आल्याने आरोपी विरुध्द जामखेड पोलीस स्टेशन येथे पोकॉ/२५१४ रणजीत पोपट जाधव, ने.स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे तक्रारी वरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.२३२/२०२३ भादविक ३२८,१८८,२७२,२७३,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.आरोपीचे फरार साथीदाराचा त्याचे राहते घरी जावुन शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, श्री.विवेकानंद वाखारे उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
