अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मे):-राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दि.३१ मे रोजी महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे आदेशाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिरजगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सरस्वती घोडके यांना जाहिर आला.आपल्या सामाजिक कार्याने मिरजगावातच नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यात विविध उल्लेखनीय समाज उपयोगी कार्य केल्यामुळे त्यांना मिळालेल्या पुरस्काराने संपूर्ण मिरजगाव आनंदित झाले आहे.विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी मिरजगावच्या सरपंच सौ.सुनिता नितीन खेतमाळस,डॉ.पंढरीनाथ गोरे,ग्रामविकास अधिकारी श्री.आटोळे,सौ.कांताबाई मंगेश घोडके,सौ.रेखा दिपक कोरडे,सौ.उषा अशोक कोरडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
