Maharashtra247

पारिजात चौकातील पत्र्यांच्या दुकानांना आग;आगीमुळे दुकानाचे मोठे नुकसान

नगर प्रतिनिधी(दि.१६ जुन):- शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकातील पत्र्यांच्या दुकानांना आज शुक्रवारी दि.१६ जुन रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविले. अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.आज दुपारी या दुकानांच्या जवळ असलेल्या जागेत कचरा पेटवल्यामुळे अथवा वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली असावी,असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.कचरा पेटवल्यानंतर वाऱ्यामुळे जळत असलेला कचरा दुकानांजवळ येऊन दुकानांना आग लागली,असे सांगण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक,नगरसेवक व पोलीस मदत कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.या आगीत तीन ते चार दुकानांचे मोठे नुकसान झाले.यात भंगार,कुशन व फर्निचर दुकानांचा समावेश आहे.आग विझवायचे काम अजूनही सुरूच आहे.

You cannot copy content of this page