महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने ओढणारे दोघे एलसीबीच्या जाळ्यात;आठ लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
नगर प्रतिनिधी (दि.१६ जुन):-नगर शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल आहे.घटनेतील फिर्यादी उषा अनिल सहस्रबुद्धे या घरासमोर रांगोळी काढून घरात जात असताना अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून नेले होते.यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नगर शहर परिसरात ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजी नगर रोडवरील जेऊर टोलनाका परिसरात फळ विक्रेते व वाहन चालक असे वेशांतर करून सापळा लावून सलीम गुलाब शेख व फिरोज शेख उर्फ लखन अजिज शेख यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आठ लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध दरोडा,जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे अहमदनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सोपान गोरे,मनोहर शेजवळ,सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे,संदीप पवार,मनोज गोसावी, बापूसाहेब फोलाने,दत्तात्रय गव्हाणे,देवेंद्र शेलार,शरद बुधवंत,रवींद्र कर्डिले,संदीप दरंदले,भीमराज खर्से,मच्छिंद्र बर्डे,प्रशांत राठोड,ज्योती शिंदे,संभाजी कोतकर यांनी पथकाने केली आहे.