Maharashtra247

छत्रपती संभाजीनगर मधील कुख्यात दरोडेखोरांची टोळी नगरमध्ये पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश;टोळीने जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकले होते दरोडे

 

अहमदनगर (दि.१९ जुलै):-नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे दरोड्याचे तयारीत असलेली सराईत आरोपींची टोळी 2,18,500/- रुपये किंमतीच्या साधनासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.बातमीची हकिगत अशी की,जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला पोलीस यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन त्यांचे विरुध्द कारवाई करणे बाबत यांना आदेश दिले होते.नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्या होत्या.नमुद सुचना प्रमाणे पथक नेवासा परिसरात फिरुन पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी पथकास कळविले की,आताच गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, खडकाफाटा,ता.नेवासा येथील सिमेंट पोल फॅक्टरी जवळ काही इसम मोटार सायकलीसह कोठेतरी गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत रस्त्याचे कडेला अंधारात बसलेले आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकाने लागलीच नेवासा पोलीस स्टेशनचे पोकॉ/शाम गुंजाळ व पंचाना सोबत घेवुन नमुद ठिकाणी जावुन वाहन रस्त्याचे कडेला लावुन पायी चालत बॅटरीचे उजेडात खात्री केली असता काही इसम अंधारात दबा धरुन बसलेले दिसले पोलीस पथकाची चाहुल लागताच सदर संशयीत इसम पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन चार (04) इसमांना ताब्यात घेतले व दोन (02) संशयीत इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) किरण बाळु काळे, वय 19, रा.बाळापुर बोलेगांव, ता.गंगापुर,जिल्हा छत्रपती संभाजी नगर, 2) रामेश्वर जंगल्या भोसले,वय 26,रा. पांडेगव्हाण,ता.आष्टी,जिल्हा बीड, 3)अभिक ऊर्फ महाडीक बंड्या भोसले वय 21, रा.बोलेगांव,ता.गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 4) स्वरुप ऊर्फ गुंड्या डिचार्ज काळे वय 24,रा.अंतापुर,ता. गंगापुर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.त्यांचे कडे पळुन गेलेल्या इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमाचे नाव 5) अरुण काळे (फरार) व 6) तीनताश्या खंडु काळे दोन्ही रा.बोलेगांव,ता.गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर (फरार) असे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एक तलवार,एक एअरगन व लाकडी दांडके मिळुन आल्याने हत्याराबाबत त्यांचेकडे अधिक विचारपुस करता संशयीत इसम नेवासा परिसरात शेतवस्तीवर जावुन कोठेतरी दारोडा घालण्याचे तयारी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल तपास करुन त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे व किती ठिकाणी दरोडा, जबरी चोरी,घरफोडी अगर चोरीचे गुन्हे केली आहे. याबाबत विचारणा करता त्यांनी नेवासा परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली.आरोपी विरुध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं.769/2023 भादविक 399,402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपींचे इतर पळुन गेलेल्या साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाही.आरोपी नामे स्वरुप ऊर्फ गुंड्या काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा,दरोडा तयारी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण -10 गुन्हे दाखल आहेत.आरोपी नामे रामेश्वर जंगल्या भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, दरोडा तयारी,घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री.सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,पोना/रविंद्र कर्डीले, संदीप दरंदले,ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे,विशाल दळवी, संदीप चव्हाण,संतोष खैरे, फुरकान शेख,पोकॉ/रोहित मिसाळ,मच्छिंद्र बर्डे,जालिंदर माने,मेघराज कोल्हे,किशोर शिरसाठ,अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे,प्रशांत राठोड व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page