Maharashtra247

राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश चत्तर खून प्रकरणी अजून दोन फरार आरोपी तोफखाना पोलिसांनी पकडले

अहमदनगर (दि.१९ जुलै):-पाईपलाईनरोड येथे दि.१५ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यावर हल्ला होऊन त्यांचा खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता.

परंतु या गुन्हयात फरार असलेले दोन आरोपी तोफखाना पोलीसांनी जेरबंद केले आहे.तोफखाना पो.स्टे.येथे दाखल असलेला गु.रजि.नं. 1030/2023 भा.दं.वि.क 302 वगैरे प्रमाणे दि.15 जुलै 2023 रोजी दाखल करण्यात आला होता.सदर दाखल गुन्हयातील मुख्य आरोपी पैकी राजु भास्कर फुलारी (वय 31 वर्षे रा. किनारा हॉटेल पाठीमागे,शेंडी बायपास) हा गुन्हा दाखल झाले पासुन मिळुन आला नव्हता त्याचा पोलीस वेळोवेळी शोध घेत होती. परंतु तो पोलीसांना हुलकावणी देत असे.तसेच स्वता:चे लोकेशन वेळोवेळी बदली करुन ठिकाण बदलत असे.परंतु आज दि.19 रोजी पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांना गोपनीय माहीतीदवारे समजले कि,सदरील आरोपी हा मानोरी,परिसर ता.राहुरी येथे असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके व तपास पथकातील पोलीस अंमलदार अशांनी जावुन सदर ठिकाणी सापळा लावुन आरोपीस मोठ्या शिताफिने ऊसाच्या शेतातुन ताब्यात घेतले.त्यास गुन्ह्यात मदत करणारा त्याचा फरार साथीदार नामे अरुण अशोक पवार वय 23,वर्षे रा. मोरे चिंडोरे,वडारगल्ली,ता.नेवासा जि.अहमदनगर यास बोल्हेगांव परिसरातुन ताब्यात घेवून नमुद गुन्ह्याच्या तपासकामी जेरबंद करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला,अपर पोलीस अधीक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, श्री.अनिल कातकाडे,पोलीस निरीक्षक तोफखाना पो.स्टे.श्री.मधुकर साळवे, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सपोनि/नितीन रणदिवे,पो.उप.नि./समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाठ, पोना/अविनाश वाकचौरे,अहमद इनामदार,वसिम पठाण,संदिप धामणे,पोकॉ/ सतिष त्रिभुवन,सचिन जगताप,शिरीष तरटे,संदिप गि-हे,सतिष भवर,दत्तात्रय कोतकर,सतिष भवर,गौतम सातपुते सर्व नेम-तोफखाना पो.स्टे.तसेच सायबर सेलचे नितिन शिंदे व राहुल गुंडू यांनी मोबाईलची तांत्रिक माहिती पुरवली,सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास हा सपोनि/जे.सी.मुजावर हे करत आहे.

You cannot copy content of this page