गौसे आज़म सेवाभावी संस्थेच्या राहुरी तालुका अध्यक्षपदी किशोर पवार यांची नियुक्ती
अहमदनगर (दि.१९ जुलै):-गौसे आज़म सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य,राहुरी तालुका अध्यक्षपदी किशोर वसंत पवार यांची नियुक्ति करण्यात आली.यावेळी संस्थापक अली सय्यद यांनी सांगितले ही एक सेवाभावी संस्था असून संस्थेने आजपर्यंत विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय कार्यक्रम राबविलेले आहेत.गौसे आजम सेवाभावी संस्थेची शाखा राहुरी तालुक्यात वाढविण्यासाठी व तिचे सामाजिक,धार्मिक व राजकीय कार्यक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी पवार यांची नियुक्ती केली आहे.यावेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष किशोर पवार यांना संस्थेचे अध्यक्ष सुलतान शेख व हाजी मंसूरभाई सय्यद यांनी शुभेच्छा देऊन म्हणाले की आपण आपल्या संस्थेचे समाजकार्य आपल्या तालुक्यात प्रवाभीपणे चालवाल हीच अपेक्षा ठेऊन राहुरी तालुका अध्यक्षपदी आपली निवड केली आहे.यावेळी तालुक्यातील नामांकित मान्यवर बाभळेश्वर दुध संघाचे संचालक व माजी सरपंच रावसाहेब पवार,समाजसेवक जालींदर बेल्हेकर,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रवीण भाऊ लोखंडे,गिरगुणे सर ग्रामपंचायत सदस्य दत्ता पटेकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजु थेटे,ग्रामपंचायत सदस्य काका गावडे सामाजिक कार्यकर्ते जे.के. पवार,ग्रामपंचायत सदस्य बापुसाहेब मोरे,शरद पवार, योगेश पवार,डॉ बागुल, पत्रकार राजेंद्र पवार,पत्रकार दिपक मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.