रिपाई कडून सुतार कुटुंबियाना तीन महिने पुरेल इतका किराणा वाटप माणुसकीचा झरा!उपकार नव्हे हे तर कर्तव्य आहे आमचे-निलेशभाऊ आल्हाट पश्चिम कार्याध्यक्ष युवक आघाडी (आठवले)
पुणे प्रतिनिधी(दि.३० जुलै):-पुणे जिल्ह्यातील मंगळवार पेठ भराव वस्ती येथील रहिवासी असलेले रमेश सुतार हा घरातील कर्ता तरुण पुरुष नुकतच त्याचं आकस्मिक दुःखद निधन झाले.त्याच्या पाश्चात्य विधवा पत्नी,एक मुलगा आणि मुलगी एवढं बिऱ्हाड घरात अठरा विश्व दारिद्रय आता पुढे काय? हा प्रश्न पत्नी श्रीमती दिपालीताई सुतार पुढे आ वासून उभा ठाकला आहे . मग काय दिपालीताईने थेट रिपाइं जनसंपर्क कार्यालयात येऊन आपली आपबिती कथन केली.ही बाब रिपाइचे निलेशभाऊ आल्हाट यांच्या कानी आली,अत्यंत गांभीर्याने घेऊन सर्व मित्र परिवारांच्या कानी घालून मोहरम (ताबूत) चा दरवर्षी येणारा खर्च टाळून तोच खर्च श्रीमती.दिपालीताई सुतार व कुटुंबातील इतर सदस्यांना तिन(३) महिने पुरेल एवढा अत्यावश्यक शिधा देऊन “माणुसकी अजूनही जिवंत आहे'” याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला.यावेळी निलेशभाऊ आल्हाट म्हणाले की उपकार नव्हे हे तर कर्तव्य आहे आमचे…!! अशा या अत्यंत भावनिक छोटेखानी कार्यक्रमा प्रसंगी गाडीतळ पोलीस चौकीचे उपनिरीक्षक अमित शेटे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मऱ्हाळे सर,गोविंदजी साठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले),उपाध्यक्ष बालाभाई शेख,निलेशभाऊ आल्हाट पश्चिम कार्याध्यक्ष युवक आघाडी (आठवले),अमर कांबळे,अभिषेक मोजर, व सुतार परिवार व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.