Maharashtra247

आमदार प्राजक तनपुरे आणि अभिषेक भगत यांच्या पासून कुटुंबीयांच्या जीविताला धोका विनोद राजू साळवे यांची पोलिसात धाव 

अहमदनगर (दि.१५ सप्टेंबर):-बुऱ्हानगर येथील अभिषेक भगत आणि त्यांच्या कुटुंबियांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचा तक्रार अर्ज विनोद राजू साळवे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिला आहे.दोन दिवसांपूर्वी विनोद राजू साळवे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अभिषेक भगत यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करणे या कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.त्यानंतर अभिषेक भगत यांनी आमदार प्राजक्त तनपुरे तसेच शिवसेनेचे आणि काँग्रेसचे काही नेते यांच्या समवेत पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप खोटे असून ते रद्द करावेत तसेच विनोद राजू साळवे याचे अवैद्य धंदे असल्याचा उल्लेखही पत्रकार परिषदेत केला होता.तसेच अभिषेक भगत यांनी काही सोशल मीडियावर स्वतःचे काही व्हिडिओ प्रसारित करून विनोद साळवे यांची बदनामी केली होती.त्या प्रकरणी सुद्धा आता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिषेक भगत यांचे विविध राजकीय पुढाऱ्यांची घनिष्ट संबंध आहेत आणि ते श्रीमंत असल्याने आमच्या सारख्या गोरगरीब लोकांवर कधीही हल्ला करू शकतात त्यामुळे भगत कुटुंबीयांपासून साळवे याच्या जीवितेला धोका असून जीवाचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार आमदार प्राजक तनपुरे आणि अभिषेक भगत कुटुंबीय असतील अशी प्रतिक्रिया विनोद राजू साळवे यांनी दिलीय तर हा सर्वसामान्य जनतेवर अन्याय असून विनोद साळवे यांच्यावर झालेल्या अन्याबाबत पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आरोपील लवकरात लवकर अटक करावी आणि इथून पुढे साळवे कुटुंबीयांना काही त्रास झाला तर आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा विनोद साळवे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page